छत्रपती शाहू महाराज हे खरे समतावादी नेते - रमेश बागवे ;छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार प्रदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 6 May 2021

छत्रपती शाहू महाराज हे खरे समतावादी नेते - रमेश बागवे ;छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार प्रदान

पुणेः- छत्रपती शाहू महाराज यांचे नेतृत्व कालातीत होते. अनेक संकाटांच्या काळात त्यांनी त्यांचे नेतृत्व सिद्ध केले. छत्रपती शाहू महाराज हे खरे समतावादी नेते होते. आजच्या राज्यकर्त्यांनी देखील छत्रपती शाहू महाराज यांचा समतावादी विचार अंमलात आणला पाहिजे, असे मत राज्याचे माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केले.

फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते आनंद साळुंके यांना यंदाचा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार रमेश बागवे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी बागवे बोलत होते. छत्रपती शाहू महाराज रोड येथील कार्यालयाजवळ हा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका लता राजगुरू, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड,  युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष राहुल शिरसाठ, युवा नेते कुणाल राजगुरू, शिवराज माळवदकर, जम्सूशेठ, कैलास झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी ही त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आणि कृतीतून दिसून येते. त्यांचा हा वारसा पुढे नेणे गरजेेचे आहे.

यावेळी बोलताना आनंद साळुंके म्हणाले की,  छत्रपती शाहू महाराजांचे विचार आजही दिशादर्शक असून त्यांच्या विचारांप्रमाणे कार्य करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. समाजाच्या तळागाळातील वंचितांच्या प्रगतीसाठी मी कायम प्रयत्नशील राहील. आजचा हा पुरस्कार मला माझ्या कार्यासाठी अधिक बळ देणारा आहे. 


छायाचित्र ओळीः- फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते आनंद साळुंके यांना यंदाचा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार प्रदान करताना राज्याचे माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे. यावेळी नगरसेविका लता राजगुरू, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages