महामाता रमाईच्या पाठिंब्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान कार्य करू शकले ... :- श्री. धम्मज्योती गजभिये, मा. महासंचालक, बार्टी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 27 May 2021

महामाता रमाईच्या पाठिंब्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान कार्य करू शकले ... :- श्री. धम्मज्योती गजभिये, मा. महासंचालक, बार्टी

महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या ८६ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार दिनांक २७ मे २०२१   रोजी बार्टी, मुख्यालय पुणे येथे महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस  व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास श्री.  धम्मज्योती गजभिये, मा. महासंचालक बार्टी पुणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी श्री. धम्मज्योती गजभिये, यांनी महामाता रमाईच्या स्मृतीस उजाळा दिला. महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे पाठिंबा दिला त्यामुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडले, व संपूर्ण देशाच्या उद्धाराचे महान कार्य करु शकले. महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी बार्टी दिन दलित वंचित उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन श्री. धम्मज्योती गजभिये, मा. महासंचालक बार्टी  पुणे यांनी व्यक्त केले.  

         महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या ८६ व्या स्मृतिदिनानिमित्त महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, पुणे वाडीया कॉलेज समोरील  महामाता रमाईच्या पूर्णाकृती पुतळ्यास श्री. धम्मज्योती गजभिये, मा. महासंचालक बार्टी पुणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री. मुरलीधर मोहोळ, मा. महापौर, पुणे, श्री. विठ्ठल गायकवाड, मुख्य समन्वयक महामाता रमाबाई आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पुणे, श्री. मेघराज भाते , योजना प्रमुख बार्टी, पुणे  श्रीमती लताताई राजगुरू, नगरसेविका, श्री. प्रदीप गायकवाड, नगरसेवक, श्रीमती मंगला ताई मंत्री, नगरसेविका, श्री. दिलीप काळे, उपअभियंता, मनपा पुणे आदी उपस्थित होते ..                              

         महामाता रमाबाई भिमराव  आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, पुणे यांच्या वतीने श्री. मुरलीधर मोहोळ, मा. महापौर पुणे यांच्या हस्ते श्री. धम्मज्योती गजभिये, मा. महासंचालक बार्टी पुणे, यांना महामाता रमाबाई आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

         बार्टी मुख्यालय पुणे येथे कोरोना  महामारीमुळे शासकीय नियमांचे पालन करून महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. सुषमाताई अंधारे, लेखिका विचारवंत, श्री. मेघराज भाते, श्रीमती स्वाती मोकाशी, श्रीमती स्मिता राऊत, श्रीमती मंजिरी देशपांडे, श्री. नितीन सहारे, श्री. सुमेध थोरात, आदी अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages