जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त कमलादेवी सेवा फाऊंडेशनच्या वतीने महिलांना मार्गदर्शन व विविध क्षेत्रातील मान्यवरांना कोरोना वीर प्रमानपत्राचे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 28 May 2021

जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त कमलादेवी सेवा फाऊंडेशनच्या वतीने महिलांना मार्गदर्शन व विविध क्षेत्रातील मान्यवरांना कोरोना वीर प्रमानपत्राचे वाटप

     

 बिलोली: जागतिक मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने कमलादेवी सेवा फौंडेशनच्या वतीने   महिलांना मार्गदर्शन ,नॅपकिन वाटप व कोरोना काळात विविध  क्षेत्रात सेवा बजावणाऱ्या मान्यवरांना छत्रपती शाहू महाराज कोरोना वीर हे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.


मासिक पाळीच्या संदर्भात  महिलांच्या अनेक  समस्या असून गैरसमज,अज्ञान व अंधश्रद्धा आजही  जाणवते.त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.  तसेच आजच्या जागतिक कोरोना महामारीत माणूसकीचे हात आखूड न होता मदतीचे झाले पाहिजे.या संकटाला सर्वांनी एकमेकांचे सहाय्यक बनून तोंड देणे हीच आजच्या काळाची गरज निर्माण झाली आहे. यासह अन्य बाबी लक्षात घेऊन कमलादेवी सेवा फौंडेशनच्या वतीने  २८मे या जगतिक  मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने  काजल कोथळीकर (कोल्हापूर)या अभ्यासू युवतीच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात महिलांना मासिक पाळी संदर्भात मार्गदर्शन व  नॅपकिन वाटप करण्यात आले. कमलादेवी फौंडेशनच्या अध्यक्षा वंदना बाबुराव कांबळे,मा. अपर जिल्हाधिकारी बी. एम.कांबळे, सचिव अनामिका कांबळे-मस्के यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या या उपक्रमातून  कोरोना काळात विविध क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांना छत्रपती शाहू महाराज कोरोना वीर  हे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी बिलोली तालुक्यातील अटकळी येथील कार्यक्रमाला विनोदराव देशमुख, शिवाजी पाटील डोंगरे, सरपंच पुष्पाताई घोडके,रणवीर डोंगरे, किसन पाटील,पिराजी भालेराव ,ग्रामपंचायत कर्मचारी,आरोग्य कर्मचारी,सोसायटीचे सदस्य आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच  कोरोना काळात  पोलीस व पत्रकार अतिशय महत्वपूर्ण कर्त्यव्य बजावत असल्याने दोन्ही घटकांची कामगिरी लक्षात घेता छत्रपती शाहू महाराज कोरोना वीर या प्रमानपत्राचे वितरण करून गौरवण्यात आले. मा. अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांच्या हस्ते रामतीर्थ पोलीस स्टेशन येथे झालेल्या गौरव कार्यक्रमात  सहायक पोलीस निरीक्षक  महादेव पुरी, रघुनाथ राठोड,संजय शिंदे,किरण कुलकर्णी मनीषा वाघमारे ,शिवशंकर शिंदे, रंजना स्वामी यासह अन्य पोलीस कर्मचारी व  पत्रकार मनोहर मोरे, धम्मनंद भेदेकर, गंगाधर कांबळे,येशवंत मोरे सत्तार इनामदार, शेख गौस डकोरे पाटील, यासह अन्य पत्रकाराला  छत्रपती शाहू महाराज कोरोना वीर प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र शंकर नगर येथेही कमलादेवी सेवा फौंडेशनच्या वतीने याच दिवशी दुपारी ४ वाजता वाजता महिलांच्या मासिक पाळी निमित्त प्रबोधन कार्यक्रम राबविण्यात आला.  कोरोना काळातील आरोग्य सेवेतील स्तुत्य कर्तव्याचाही एक  भाग म्हणून कमलादेवी सेवा फौंडेशनच्या वतीने आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या कर्तव्यावर सन्मानाची थाप म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र शंकर नगर येथील   वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा कोल्हे ,   वैद्यकीय समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.रघुनाथ क्षेत्री,आर.जी.बोमने, एन. एस.वाघमारे गोविंदवाड के.एन. यासह येथील सर्व आरोग्य सेवेतील कर्मचारी,व पोलीस पाटील,सरपंच,ग्रामपंचात कर्मचारी,स्वस्थ धान्य दुकानदार यासह विविध क्षेत्रातील कोरोना काळातील सेवा बजावणाऱ्यांना छत्रपती शाहू महाराज कोरोना वीर या प्रमानपत्राने सन्मानित करण्यात आले. असून  तालुक्यातील या कार्यक्रम शृंखला यशस्वी करण्यासाठी गौतम कांबळे,संघरत्न निवडंगे, यासह अनेकांनी परिश्रम घेतले.






No comments:

Post a Comment

Pages