बाबासाहेबांच्या उत्तरार्धात सावली म्हणून माईसाहेब उभ्या राहिल्या प्रा.देवानंद पवार यांचे प्रतिपादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 29 May 2021

बाबासाहेबांच्या उत्तरार्धात सावली म्हणून माईसाहेब उभ्या राहिल्या प्रा.देवानंद पवार यांचे प्रतिपादन

पिपल्सच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने नागसेनवनात माईसाहेबांना स्मृतिदिनी अभिवादन

औरंगाबाद:

रामाईच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीने व्याकुळ होणाऱ्या बाबासाहेबांच्या उत्तरार्धात माईसाहेब सावली म्हणून उभ्या राहिल्या असे प्रतिपादन प्रा.देवानंद पवार यांनी नागसेनवनात केले.

मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेयर असोसिएशनच्या वतीने स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 पुढे बोलतांना प्रा.पवार यांनी सततचे जागरण प्रवास ह्यामुळे बाबासाहेबांना अनेक व्याधींनी ग्रासलेले असतांना ह्या दुबळ्या समाजाला बाबासाहेबांच्या रूपाने मिळालेला वाली जर जगवायचा असेल तर त्यांच्या प्रकृतीची योग्य निगा राखणे अत्यंत गरजेचे आहे हे वारंवार उपचार करणारे डॉक्टर सांगत अनेकांनी त्यांना विवाह करण्याचा सल्ला दिला खूप विचारपूर्वक बाबासाहेबांनी माईसाहेबांशी विवाह केला. वैद्यकीय ज्ञानामुळे ही जबाबदारी माईसाहेबांनी उत्तमरित्या पार पाडली एक पत्नी नव्हे तर बाबासाहेबांच्या उत्तरार्धात सावली म्हणून माईसाहेबांनी योगदान दिले आहे.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयांची उभारणी,हिंदू कोडबील चे लिखाण-संसदेत प्रभावी मांडणी,भारतीय बौद्ध महासभेची,समता सैनिक दल,बौद्धजन पंचायत समिती ची स्थापना, धर्मांतराचा ऐतिहासिक निर्णय,प्रबुद्ध भारत वृत्तपत्राची सुरवात असे महत्वपूर्ण निर्णय बाबासाहेबानी माईसाहेबांच्या साक्षीने अन साथीने घेतले,बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा नंतरही रिपब्लिकन पक्षाच्या बांधणीसाठी,भारतीय बौद्ध महासभेच्या प्रचारार्थ माईसाहेबांनी दिलेले योगदान जगासमोर येऊ शकले नाही माईसाहेबांचे कार्य खऱ्या अर्थाने महिलांसाठी प्रेरणादायी आहे महिलांनी ह्याचा अभ्यास करावे  असे विचार व्यक्त केले.

यावेळी सचिन निकम,ऍड.अतुल कांबळे, सचिन भुईगळ,सम्राट भुईगळ,विकास रोडे,ऍड.रत्नदीप कांबळे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages