उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आरक्षण उपसमिती च्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा ; पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या रिपब्लिकन कामगार सेनेची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 17 May 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आरक्षण उपसमिती च्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा ; पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या रिपब्लिकन कामगार सेनेची मागणी

औरंगाबाद :    रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने औरंगाबाद येथे निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधवर यांच्या मार्फत निवेदन सादर करून मुख्यमंत्र्यांकडे पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी पदोन्नतीतील आरक्षण प्रकरणी शासनाने काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करा,पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत सुरू ठेवा,राज्यसरकार च्या वतीने पदोन्नतीतील आरक्षण सुरू ठेवण्याकरिता सुप्रीम कोर्टात पाठपुरावा करावा,उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आरक्षण उपसमिती च्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा आदी मागण्या करण्यात आल्या.

या वेळी प्रदेश उपाध्यक्ष सचिन निकम,जिल्हाध्यक्ष अशोक मगरे,संपर्कप्रमुख शैलेंद्र म्हस्के,जिल्हा महासचिव सचिन जगधने,जिल्हा कार्याध्यक्ष दिपक जाधव,शहर अध्यक्ष दिनेश गवळे,ऍड.अतुल कांबळे, गुरू कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages