लोकोपयोगी व पर्यावरणपूरक उपक्रमांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचा वाढदिवस साजरा ; ठिकठिकाणी वृक्षारोपण,घाटीत औषधी वाटप,नेत्र तपासणी शिबीर संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 2 June 2021

लोकोपयोगी व पर्यावरणपूरक उपक्रमांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचा वाढदिवस साजरा ; ठिकठिकाणी वृक्षारोपण,घाटीत औषधी वाटप,नेत्र तपासणी शिबीर संपन्न

 औरंगाबाद :    रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रिपब्लिकन सेना,रिपब्लिकन विद्यार्थी सेना व रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने भरगच्च लोकोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.


सकाळी 10 वाजता पी इ एस शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे बोधी वृक्ष लावण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य भास्कर साळवी यांची उपस्थिती होती.

डॉ.महादेव उबाळे,प्रा.शैलजा निकाळजे,बागुल सर,अनिल साळवे,सुनील शिंदे,अक्षय दाणे,बेग,मोहन खंडागळे आदींची उपस्थिती होते

रिपब्लिकन सेनेचे शहर अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दुपारी १२ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) ला रिपब्लिकन कामगार सेना व रिपब्लिकन विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने 7 बॉक्स सलाईन व मेडलाईफ फार्माच्या वतीने मल्टि व्हिटॅमिन,अँटी बायोटिक च्या 300 स्ट्रीप,100 आरोग्यवर्धक टॉनिक देण्यात आले ह्या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश हरबडे,मेडलाईफ फार्मा चे डायरेक्टर सतीश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिपब्लिकन कामगार सेनेचे अशोक मगरे,जिल्हासचिव सचिन जगधने,शहराध्यक्ष दिनेश गवळे,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड.अतुल कांबळे,सागर ठाकूर,गुरू कांबळे,प्रवीण हिवराळे,महेंद्र तांबे,सागर प्रधान,विकास रोडे,सामाजिक कार्यकर्ते पवन पवार,रिपाई चे मनीष नरवडे,सचिन भुईगळ,सुबोध जोगदंड,प्रवीण हिवराळे,शैलेंद्र म्हस्के यांनी परिश्रम घेतले सचिन निकम यांनी आयोजन केले होते.


मुकुंदवाडी येथील राजहंस माध्यमिक विद्यालय येथे रमेश अवचार,मुख्याध्यापिका अवचार मॅडम,शिक्षक राऊत सर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत रुपेकर यांनी केले होते.

मिलिंद नगर उस्मानपुरा येथे विशाल डोळ्यांचा दवाखाना,माया क्लिनिक चे डॉ.विशाल शिंदे,डॉ.भावे यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी व आरोग्य शिबीर पार पडले कार्यक्रमाचे आयोजन प्रा.सिद्धोधन मोरे,सचिन निकम,सुबोध जोगदंड, सचिन शिंगाडे यांनी केले होते एकूण ९४ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.


मावसाळा येथे भदंत एस.प्रज्ञाबोधी महाथेरो यांच्या उपस्थितीत धम्म भूमी येथे बोधी वृक्ष लावण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन बाळू घाटे यांनी केले होते


फतीयाबाद येथे सरपंच नंदाबाई साठे,जनार्दन काका गवळी,कृष्णा मोरे,अविनाश काटकर,विजय बनकर,विजय बनसोडे,विट्ठल जाधव,रंजना साठे,सबेरा आपा, शोभा बाई भालेराव,गायकवाड ताई यांची उपस्थिती होती 

कार्यक्रमाचे आयोजन बबन साठे यांनी केले होते.

सर्वच कार्यक्रमात मराठवाडा संघटक आनंद कस्तुरे,पूर्व जिल्हाध्यक्ष प्रा.सिद्धोधन मोरे,जिल्हाध्यक्ष पश्चिम काकासाहेब गायकवाड,शहराध्यक्ष मिलिंद बनसोडे,रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम,नेते चंद्रकांत रुपेकर,बबन साठे,कैलास निळे,विकास हिवराळे,युवा शहर अध्यक्ष सचिन गायकवाड,रामराव नरवडे,सचिन शिंगाडे,महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्षा मनीषाताई साळुंखे,वाळूज महानगरचे अध्यक्ष राहुल कानडे, कृष्णा मोरे,पूर्व शहर अध्यक्ष धम्मपाल भुजबळ,गणेश रगडे,राघव हिवराळे,अतिष रुपेकर आदींसह सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages