आशिष पाटील यांच्या स्मृतीपित्यर्थ ६२ रक्तदात्यांनी केले रक्तदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 1 June 2021

आशिष पाटील यांच्या स्मृतीपित्यर्थ ६२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

नांदेड : कोरोनामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी झाल्यामुळे रक्ताची कमतरता भासू नये, म्हणून कै. इंजि. आशिष पाटील यांच्या द्वितीय स्मृतीपित्यर्थ मंगळवार दि. १ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. 


गत वर्षांपासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोनामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच रक्त पिशव्यांची कमतरता भासत आहे. यामुळे रक्ताची कमतरता भासू नये, म्हणून कै. इंजि. आशिष पाटील यांच्या   स्मृतीपित्यर्थ   त्यांच्या मित्र परिवारातर्फे मंगळवारी शहरातील दत्त मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. 

दरम्यान, ताराबाई बोधीलाल जैन वृद्धाश्रम येथे फ्रिजदान व भोजनदान करण्यात आले. तसेच सुमन बालगृह येथेही अन्नदान करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी स्वप्निल नरबाग, इंजि.स्वप्निल इंगळे पाटील, डाॅ.विनय पाटील, गिरीश सोनटक्के, सुहास वाघमारे, मयुर शेरे, अंबर देशमुख, अशिष इंगळे, स्वप्निल पारेकर, अॅड.स्वप्निल वसतमतकर, राहूल गिते, प्रविण उमाटे, आकाश पाटील, निनाद काळे, ओंकार आढाव, समर्थ राऊतवार, रूविज शंकरवर, धनंजय उप्पलवाड, प्रविण करखेले, संतोष बारहाते, निखिल गर्जे, प्रदिपसिंग पुजारी, हरपीतसिंग सतपालसिंग पुजारी आदींनी परिश्रम घेतले.No comments:

Post a Comment

Pages