संघर्ष फाऊंडेशन कोल्हापूर आयोजित, सावित्रीज्योती करंडक राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 1 June 2021

संघर्ष फाऊंडेशन कोल्हापूर आयोजित, सावित्रीज्योती करंडक राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

कोल्हापूर  : फुले, शाहू, आंबेडकर विचाराचे पँथर दत्ता जाधव व विद्या जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी संघर्ष फाऊंडेशन कोल्हापूर तर्फे सावित्रीज्योती करंडक विभागीय व राज्यस्तरीय भव्य ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम ऑनलाईनद्वारा दिनांक ३० मे रोजी उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत माध्यमिक गटात १९१ व खुल्या गटात १६२ एकूण ३५३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.


कार्यक्रमाची सुरुवात अतका कारंजकर व सुनिल कारंजकर यांनी 'हिच आमुची प्रार्थना' या गीताने गाऊन करण्यात आली. संघर्ष फौडेशनचे संस्थापक चारुशीला जाधव व सिद्धार्थ जाधव यांनी दत्ता जाधव व विद्या जाधव यांच्या सामाजिक कार्याचा आढावा व फौडेशनचे उपक्रम याविषयी मनोगत प्रास्ताविकामधून व्यक्त केले. स्पर्धेला लाभलेल्या नामांकित व अभ्यासू परीक्षकांची ओळख सांगण्यात आली.


"माणूस हा परिवर्तनवादी आहे. सध्या फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांची नवी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी संघर्ष फौडेशनने पेतली आहे. असे मत लेखक व्याख्याते प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले. लोकप्रिय अभिनेते अंशुमन विचारे यांनी अनुभव कथन केले, लेखिका दीपा देशमुख यांनी वक्तृत्वाविषयी मनोगत व्यक्त केले. परिक्षक दया वानखेडे, ताज मुलाणी महेश अचिंतवाल यांनी स्पर्धकांना वक्तृत्वावद्दल मार्गदर्शन केले. "कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी चिकाटी, सतत प्रयत्न आवश्यक आहेत असे उदगार आपले अनुभव सांगत कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्योग विभाग महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव हर्षदिप कांबळे यांनी काढले.


राज्यस्तरीय माध्यमिक गटात विशाखा आरेकर प्रथम, प्रसाद परळे द्वितीय, वृषांक जाधव, हर्षदा पवार व सिद्धों घाडगे विभागून तृतीय तर उत्तेजनार्थ मयूरी कांबळे, वेदांत गावडे, संस्कृती म्हात्रे, शमिका बिपकर, मयूर बिले यांची निवड झाली.


आणि राज्यस्तरीय खुल्या गटात सिद्धेश मिसाळ प्रथम, अक्षय ईळके द्वितीय, आशुतोष निकम तृतीय तर उत्तेजनार्थ प्रसाद जगताप, सुजित काळगे, रोहन कवडे, शिवम माळकर, विवेक वारभुवन, रेणुका धुमाळ यांनी क्रमांक पटकावला 


राज्यस्तरीय माध्यमिक गटासाठी प्रथम रु.५०००/, द्वितीय रु.३०००/, तृतीय रु.१०००/ व राज्यस्तरीय खुल्या गटासाठी प्रथम रु.१०,०००/, द्वितीय रु.५०००/, तृतीय रु.३०००/, विभागीय खुल्या गटासाठी रु.१०००/. रु.७००/रु.५००/ व विभागीय माध्यमिक गटासाठी रु.७००/रु ५००/रु. ३००/याप्रमाणे रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.


वैशाली जाधव, नागसेन जाधव, सचिन अकोलकर, अतुल रुकडीकर, सरोज रुकडीकर, संजय बोत्रे, अलका कारंजकर, सुनिल कारंजकर, प्रमोद मोहिते, सुहास चव्हाण, अक्षय जहागीरदार, रमजान मुल्ला, काजल कोथलीकर, ऋतुजा जगदाळे यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. चारुशीला जाधव यांनी केले व आभार सिद्धार्थ जाधव यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages