नांदेड : महाराष्ट्र हा सध्या कोरोना विषाणु च्या विळख्यात सापडला आहे.यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.यामध्ये विशेषतः जे बाहेरगावी विद्यार्थी होते व ज्यांना शिक्षणासाठी घरून मदत होत होती या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे . तसेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात होऊन बराच कालावधी झालेला आहे, यामुळे विद्यार्थी हा अडचणीत सापडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ काही प्रमाणात विद्यार्थ्यांना मिळाला आहे तर अनेक विद्यार्थी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. या योजने बद्दल वारंवार निवेदन, पत्राद्वारे पाठपुरावा करून सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. येत्या दहा दिवसात जर विद्यार्थ्यांच्या खात्यात योजनेची पैसे जमा झाले नाही, तर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या मागणीचे निवेदन वंचित बहुजन युवा आघाडीचे शुद्धोधन कापसीकर, वैभव लष्करे, यशवंत गोणारकर यांच्या वतीने समाज कल्याण आयुक्त माळवतकर यांच्याकडे देण्यात आले.
No comments:
Post a Comment