अर्थचक्र सुरू होत असले तरी जीवनचक्र बिघडू नये याची दक्षता घ्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने आज सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 8 June 2021

अर्थचक्र सुरू होत असले तरी जीवनचक्र बिघडू नये याची दक्षता घ्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने आज सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

औरंगाबाद:

 कोरोनाची लाट जरी ओसरली असली तरी भविष्यात    ऑक्सिजनची कमतरता भासू नये. यासाठी  जिल्हातील औरंगाबाद,वळूज,वैजापूर,कन्नड,सिल्लोड, सोयगाव,पैठण,करमाड,बिडकीन इ. ठिकाणी ऑक्सिजन प्लान्ट जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उभारण्यात येत आहेत. 


 या अनुषंगाने सर्व SDO व नोडल अधिकारी यांची आज बैठक घेण्यात आली. संबंधित ठिकाणी PSA प्लान्ट उभारणीसाठी आवश्यक असलेले शेड उभारण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.

PSA प्लान्ट बाबत कुणाला काही शंका असेल तर त्यांनी  वाळूज आणि औरंगाबाद मधील प्लान्टला आपल्या इंजिनिअर समवेत भेट देऊन प्लान्ट समजून घेण्याच्या सूचना केल्या.

कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरू शकणाऱ्या व्यापाऱ्यांची RTPCR चाचणी बंधनकारक आहे म्हणून आपल्या क्षेत्रातील व्यापाऱ्यांच्या बैठक घेण्याच्या सूचना करत गावामध्ये रिक्षाच्या माध्यमातून जनजागृती करण्यास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

हॉटेलच्या एकूण आसनक्षमतेच्या फक्त 50% ग्राहकांना बसण्याची परवानगी आहे. म्हणून आसनक्षमता संदर्भात माहिती हॉटेलच्या दर्शनी भागात लावली असल्याची खात्री करून घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.No comments:

Post a Comment

Pages