इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब किनवट चे कार्याध्यक्ष आशिष शेळके यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 3 June 2021

इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब किनवट चे कार्याध्यक्ष आशिष शेळके यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा.

किनवट : अत्यंत कमी कालावधीतच नावलौकिक झालेले, तसेच प्रत्येकांना अडचणी च्या वेळी धाऊन जाणारे दैनिक सकाळ चे निर्भीड पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब चे कार्याध्यक्ष आशिष शेळके  यांचा वाढदिवस आज दिनांक ३ जुन रोजी आज की न्युज च्या कार्यालयांमध्ये अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. 

          आशिष शेळके हे राजपथ अकॅडमी व स्वराज कोचिंग क्लासेस चे संचालक असुन विद्यार्थ्यांना योग्य दिशा व ज्ञान देऊन त्यांचे भविष्य घडविण्याचे कार्य करतात. तसेच आशिष सर अनिमेष मायक्रो फायनान्स चे संचालक असुन लहान उद्योगधंद्यांना फायनान्स देखील पुरवतात. तसेच अल्पकालावधीतच शैक्षणिक क्षेत्र, समाजकार्य व पत्रकारीतेमध्ये त्यांनी त्यांची वेगळी छाप पाडली आहे. खरंतर आशिष शेळके यांचा वाढदिवस १ जुन रोजी असतो पण १ जुन व २ जुन या दोन्ही दिवशी त्यांनी त्यांचा वाढदिवस त्यांच्या परीवार सोबत, विद्यार्थ्यांसोबत व मित्रपरिवार सोबत साजरा केला म्हणुन ३ जुन रोजी इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब च्या सर्व पत्रकार बांधवांकडून आज त्यांचा वाढदिवस आज की न्युज च्या कार्यालयांमध्ये साजरा करण्यात आला.

           आशिष सरांचा वाढदिवस साजरा करताना नसिर तगाले सर, आनंद भालेराव सर, शेख परवीन मॅडम, राजेश पाटील सर, नदीम सर व इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब चे इतर प्रतीनीधी व इतर पत्रकार बांधव आणि नागरीक उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता.

No comments:

Post a Comment

Pages