किनवट शहर प्रतिनिधी:-
किनवट शहरात फिल्टर च्या पाण्याची संख्येने दुकाने थाटली आहे परंतु भरमसाठ पैसे मोजुनही शुध्द पाणी न देता ग्राहकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे पाण्यामध्ये डास सदृश्य आळ्या आढळून येत आहे.
अशाच एका फिल्टर पाण्याच्या दुकानातुन घरपोहच आलेले पाणी किनवट येथील युवा सामाजीक कार्यकर्ते राजेश पाटील याच्यां घरी फिल्टर च्या पाण्यात डास सदृश्य आळ्या आढळुन आल्याने त्यांनी सदरील बाब प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ संलग्नित इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडिया च्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणुन दिल्या नंतर पत्रकारांनी किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार व न प स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांच्या यांना निवेदन देऊन विनंती केली या प्रसंगी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी संबधीतावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले प्लांट द्वारे शुध्द पाणी देण्यात यावे अन्यथा त्यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ , इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडियाने केली आहे.
No comments:
Post a Comment