सेवार्थ फाउंडेशन तर्फे घोटी येथे निर्जंतुकीकरण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 3 June 2021

सेवार्थ फाउंडेशन तर्फे घोटी येथे निर्जंतुकीकरण

 किनवट :   सेवार्थ फाउंडेशन तर्फे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एका आदिवासी घोटी गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे . कोरोना सारखा महाभयंकर आजार पूर्ण देशात पसरत आहे . त्याचसोबत आज  डेंगू , मलेरिया , टायफाइट , चिकन गुनिया , असे महाभयंकर आजाराची पडसात सर्वत्र दिसून येत आहे यालाच लक्षात घेऊन  सेवार्थ फाउंडेशन मार्फत सॅनीटाइझर मच्छर (कीटक) नाशक फवारणी घोटी येथे करण्यात आली .

सेवार्थ फाउंडेशन तर्फे घोटी येथे निर्जंतुकीकरण

सध्या देशात कोरोना ने थैमान घातले आहे याचा प्रादुर्भाव रोखणयासाठी राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे , सेवार्थ फाउंडेशन या सामाजिक संस्थाच्या पुढाकाराने कोरोना जनजागृति सुद्धा करण्यात आली.  यावेळी स्वयंसेवक म्हणून फवारणी करणारे तेजस पाटील, जयकुमार कयापाक, आणि गावातील युवक राहुल पाटील, ऋषिकेश शेंडे, संघापल पाटील, सुशांत मुनेश्वर, सुंदर घुले, सतीश  घुले,  प्रसेनजित कयापाक, प्रशिक पाटील, रितेश कयापाक, रंजीत पाटील, प्रेमकुमार कयापाक, अरबाज पठाण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages