नांदेड : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रशासकीय कार्यालय नांदेड तर्फे सर्व कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा दि. २० जुलैपासून सुरू करण्यात आली आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात वाढ आहे. कोरोनामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष होत असल्याने आणि वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
रुग्णवाहिकेच्या उद्घाटन प्रसंगी नांदेड प्रशासकीय कार्यालयाचे डीजीएम श्रीनिवास अकुला, नांदेडचे क्षेत्रीय व्यवस्थापक नविन कुमार उप्पलवार, एसबीआय अधिकारी संघटनेचे विभागीय सचिव किरण कुमार जिंतुरकर, नांदेडचे रिजनल सेक्रेटरी विनोद साखरे, शशिकांत कुलकर्णी, आशिष जाधव, प्रदीप गुठे व अय्यर मॅडम आदींची यावेळी उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment