हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते " ऑक्सिजन काँसंट्रेटर बँक " चे उद्घाटन व लोकार्पण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 26 July 2021

हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते " ऑक्सिजन काँसंट्रेटर बँक " चे उद्घाटन व लोकार्पण

 


मुंबई   :

राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती आणि ग्लोबल बुद्धिस्ट काँग्रीगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कांजूरमार्ग, मुंबई येथे,  माननीय डॉ हर्षदीप कांबळे सर ( IAS ) यांच्या हस्ते " ऑक्सिजन काँसंट्रेटर बँक " चे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.  ऑक्सिजन काँसंट्रेटर ची  मोफत सेवा देणारी महाराष्ट्रातील ही पहिलीच बँक असणार आहे. याचा लाभ मुंबई व मुंबई शेजारील परिसरातील गरजू नागरिकांना होणार आहे. या अनुषंगाने  नवीमुंबईतील नागरिकांसाठीहि  ऑक्सिजन काँसंट्रेटर देण्यात आले. डॉ. हर्षदीप कांबळे सर ( IAS ) यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्र भारतील 100 हून अधिक ठिकाणी ऑक्सिजन काँसंट्रेटर पुरविण्यात आलेले आहे. त्यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या या सुज्ञ उपक्रमाचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages