गरोदर मातांकरिता सिडकोत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 28 July 2021

गरोदर मातांकरिता सिडकोत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन


नांदेड   : नांदेडच्या 'सिडको' परिसरातील 'ओजस' मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने गुरूवारी (दि. २९ जुलै रोजी) गरोदर माता व स्रियांच्या विविध आजारांची तपासणी करण्यासाठी 'मोफत' आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 

नांदेडच्या सिडको भागातील डॉ.केळकर हॉस्पिटल बिल्डिंगमधील 'ओजस' मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुरुवार दि. २९ जुलै रोजी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात स्रिरोग, प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. जयसिंग, डॉ. विरेश बिराजदार, डॉ. माधूरी शेळके, डॉ. भास्कर औराळकर आणि त्यांचे अन्य सहकारी डॉक्टर मंडळी हे सिडको-हडको परिसरातील गरोदर माता तसेच अन्य महिलांच्याही विविध आजारांविषयीची मोफत आरोग्य तपासणी करणार आहेत. 

विशेष म्हणजे, 'ओजस' मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने २९ जुलै रोजी नांदेडच्या 'सिडको' भागातील डॉ. 'केळकर' हॉस्पिटल बिल्डींगमध्ये 'सिडको-हडको' परिसरातील सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने तसेच नाममात्र फिसमध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या 'ओजस' मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयोजित मोफत आरोग्यतपासणी शिबिरात स्त्रिरोग तसेच प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. जयसिंग, डॉ. विरेश बिराजदार व डॉ. माधुरी शेळके तसेच त्यांचे अन्य सहकारी डॉक्टर मंडळी गरोदर माता व अन्य महिलांच्याही विविध 'आरोग्य विषयक समस्या' या विषयावर मार्गदर्शनही करणार आहेत. दरम्यान, प्रस्तुत आरोग्य तपासणी शिबिरातील महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचारसुध्दा मोफत करण्यात येणार आहे. या मोफत शिबिराचा 'सिडको तसेच हडको' परिसरातील बहुसंख्य महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिबिराचे मुख्य आयोजक डॉ. भास्कर औराळकर तसेच समन्वयक प्रविण सोनसळे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages