ग्रामसेवक बदली प्रक्रिया पारदर्शक : सुनिल पारडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 28 July 2021

ग्रामसेवक बदली प्रक्रिया पारदर्शक : सुनिल पारडे

नांदेड, दि. 28 जुलै -

जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामसेवकांची बदली प्रक्रिया पार पडली  असून ही बदली प्रक्रिया पारदर्शक व समाधानकारक झाली असल्याचे प्रतिपादन कृषी पदवीधर ग्रामसेवक संघटनेचे सचिव सुनिल पारडे यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न होत असलेल्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्याण सभापती अ‍ॅड. रामराव नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्यासह अन्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बदली प्रक्रीया पार पडली. कोव्हिड काळामध्ये अनेक कर्मचार्‍यांची गैरसोय झाली होती. तसेच काही कर्मचार्‍यांचा कोव्हीडमध्ये सेवा देत असतांना मृत्यू देखील झाला आहे. त्यानंतर शासनाकडून कोव्हिडच्या पार्श्वभुमीवर बदली करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी वर्षाताई ठाकुर यांच्या पुढाकाराने बदली प्रक्रिया संपुर्णपणे पारदर्शक व समाधानकारक झाली आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पारदर्शकपणे पार पडलेल्या या बदली प्रक्रियेमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे कृषी पदवीधर ग्रामसेवक संघटनेचे सचिव सुनिल पारडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Pages