मुंबई दि. 12 - संघर्ष करणाऱ्या तरुणांचे चेहरे पाहतो मी आणि शहीद भीमसैनिकांना श्रद्धांजली वाहतो मी असे सांगत आंबेडकरी चळवळीला तलवारीची धार आहे. त्यासाठी गटतट गाडून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. ऐक्य केले पाहिजे. रिपब्लिकन ऐक्य आता कठीण आहे. ऐक्य करायचे असेल तर कार्यकर्त्यांनी आपआपल्या वस्तीतून ऐक्याची सुरुवात केली पाहिजे.सर्व गट विसर्जित करून वस्तीत ऐक्य घडविले पाहिजे. असे रिपब्लिकन ऐक्य मान्य नसणाऱ्या आणि ऐक्यातून फुटणाऱ्या नेत्यांना आपल्या वस्तीत प्रवेशबंदी करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केले. माता रमाबाई आंबेडकर नगरातील शहिदांच्या 24 व्या स्मृतिदिना निमित्त रिपाइं तर्फे आयोजित जाहीर श्रद्धांजली सभेत ना रामदास आठवले बोलत होते.
यावेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे;डी एम चव्हाण; भदंत विरत्न थेरो; लक्ष्मण अभंगे; डॉ हरीश अहिरे; चिंतामण गांगुर्डे; सो ना कांबळे; बाळासाहेब गरुड; रवी गायकवाड; शशिकला जाधव;नैना वैराट; भारती गुरव; नंदू साठे; राजेश सरकार; कैलास बर्वे; रवी नेटवटे; योगेध शिलवंत अजित रणदिवे ; गायिका वैशाली शिंदे सुहासिनी शिंदे; संदेश मोरे;सलीम खान; किशोर संगारे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
नाशिक ओझर येथील विमानतळाला पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याचा लढा अधिक तीव्र करणार असल्याची घोषणा यावेळी ना रामदास आठवले यांनी केली.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष मी संपूर्ण देशात पोहोचविला आहे.काही जणांनी रिपब्लिकन नाव पुसण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही मात्र रिपब्लिकन नाव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष रिपब्लिकन पक्ष म्हणून संपूर्ण देशात मजबूत करू असा निर्धार ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
गंधकुटी बुद्धीविहार येथील जाहीर श्रद्धांजली सभा झाल्यानंतर ना रामदास आठवले यांनी रमाबाई आंबेडकर नगरातील शाहिद स्मारकाला भेट दिली यावेळी माजी नगरसेवक नामदेव उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment