विमुक्त जाती भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू रामजी इदाते यांची सामाजिक न्याय भवनास भेट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 30 July 2021

विमुक्त जाती भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू रामजी इदाते यांची सामाजिक न्याय भवनास भेट

नांदेड, दि. 30  :- विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले व भारत सरकारच्या विमुक्त जाती भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू रामजी इदाते यांनी नांदेड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी भवनातील सर्व कार्यालये व परिसरातील स्वच्छतेसह इतर बाबी उत्कृष्ट असल्याबाबत समाधान व्यक्त केले. 


सामाजिक न्याय भवनाचा परिसर, अभिलेख अभिरक्षा कक्ष, समाज कल्याण विविध योजनांच्या ऑनलाईन प्रणालीची माहिती घेतली. कार्यालयातील झिरोपेंडन्सीसह जिल्हयातील सर्व शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या ईमारतीशी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे नेहमी संपर्कात असल्याचे त्यांनी कौतुक केले. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाला प्राप्त झालेला कॉर्पोरेट ऑफीसचा लूक, वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम आणि परिसरातील डवरलेल्या फुलबागा आणि झालेले वृक्षारोपणाचे काम याबददल प्रशंसा करुन शासकीय कार्यालयात अशा बाबी होणे ही एक दुर्मीळ घटना आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. 


सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर हे एक उपक्रमशील अधिकारी असून ते अत्यंत चांगले कार्य करीत आहेत असे उदगार त्यांनी यावेळी काढले. यावेळी सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी हे श्रेय माझ्या एकटयाचे नसून माझ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आहे. आम्हास सतत प्रेरणा देणारे समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर, समाज कल्याण विभाग लातूरचे प्रादेशिक उपायुक्त दिलीप राठोड यांचे अमुल्य मार्गदर्शनाने हे होऊ शकले असेही यावेळी सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर म्हणाले. देवीदास राठोड, माणिक जोशी, राजीव एडके, कवी बापू दासरी, वरीष्ठ समाज कल्याण निरीक्षक व राजेश सुरकूटलावार आणि सामाजिक न्याय विभागाचे सर्व कर्मचारी आणि काही समाज सेवकही उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

Pages