शब्दक्रांती ' प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशन सोहळा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 24 July 2021

शब्दक्रांती ' प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशन सोहळा


किनवट , दि.२४ : शब्दक्रांती ' प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशन सोहळा उद्या (दि.२५) सकाळी ११ वाजता स्मृतीशेष प्रा.डॉ. अंबादास कांबळे नगरी, जेतवन बुद्धविहार सिद्धार्थ नगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी       गझलकार मधु   बावलकर,आदिलाबाद, तेलंगणा हे राहणार आहेत. स्मृतिशेष अनिल शिंदे विचार मंचावर कवितासंग्रहातील सहभागी कवी कवयित्रींचे कविसंमेलन होणार आहे.

        कवी संमेलनात   ऍड.के.के. साबळे, सुजाता पोपलवार, प्रा.डॉ. गजानन सोनोने, वंदना तामगाडगे  प्रा.डॉ. किरण पाईकराव, नंदा नगारे, महेंद्र नरवाडे. शांता राके,  प्रा.विनोद कांबळे,   प्रा. एस.डी. वाठोरे , प्रतीक्षा ठमके, प्रा.आनंद सरतापे, सीमा पाटील, रामजी कांबळे, राजा तामगाडगे, राजेश पाटील, चंचलकुमार मुनेश्वर, परमेश्वर सुर्वे, भारतध्वज सरपे, सोमा पाटील, प्रा.डॉ. राजू मोतेराव, सुरेश शेंडे, शेषेराव पाटील, चंद्रकांत धोटे, रितिक जोगदंडे,  प्रा.धनराज हलवले, प्रा.सुबोध सरपे, राजू कांबळे,  रुपेश मुनेश्वर,  सुमेध घुगरे,  मारुती काळबांडे, अभि. मनीष गवई,  माणिक भवरे, सुरेश पाटील, अनिल उमरे, शीलरत्न पाटील हे सहभागी होणार आहेत.

   सूत्रसंचालन उत्तम कानिंदे हे करणार आहेत. प्रास्ताविक रमेश मुनेश्वर हे करणार आहेत. आभार प्रा.डॉ. पंजाब शेरे हे करणार आहेत.

संयोजन महेंद्र नरवाडे, रुपेश मुनेश्वर, प्राचार्य सुरेश पाटील, भारतध्वज सर्पे, राजेश पाटील, प्रा. सुबोध सर्पे हे करणार आहेत.उपस्थित रहाण्याचे आवाहन क्रांतीसूर्य परिवारातर्फे अध्यक्ष रमेश मुनेश्वर यांनी केले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कार्यक्रमास मास्क, सॅनिटायझरचा वापर करून आणि सुरक्षित अंतर ठेवून कार्यक्रम होणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages