किनवट -माहूर मतदारसंघातील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देनार नाही - आमदार भीमराव केराम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 24 July 2021

किनवट -माहूर मतदारसंघातील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देनार नाही - आमदार भीमराव केराम

किनवट , :  कोरोना महामारीच्या जीवघेण्या आजाराने सर्वत्र हाहाःकार माजल्याने जनजिवन विस्कळीत झाल्यामुळे नागरीकांना अतोनात हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. कोरोनाच्या महामारीच्या संकट काळातही नागरिकांनी  दाखवलेल्या विश्वासाला सार्थ खरे ठरले ते विद्यमान आमदार भीमराव केराम.त्यांनी मतदारसंघ पिंजुन काढत प्रशासकीय यंत्रणेला विश्वासात घेउन मतदार संघातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी  अहोरात्र परिश्रम घेत असल्याची माहिती भाजपा नेते अनिल तिरमनवार यांनी दिली.  

  आ.केराम यांनी कोरोनां विषाणु संसर्गाच्या काळाता स्वतःच्या आरोग्याची  तमा न बाळगता किनवट माहुर विधानसभा मतदारसंघातील वानोळा, माहूर, वाई, सिंदखेड, उमरी, मांडवी, किनवट , अप्पारावपेठ, इस्लापूर, बोधडी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्नालयला भेट देऊन अडीअडचणी जाणून घेउन नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने उपयुक्त अशा विविध सूचना आरोग्य यंत्रणेतील कर्मचा-यांना दिल्या. यामुळे प्रशासकीय यंत्रणा ही कोरोना काळात सतर्क राहीली असल्याने नागरीकांना विविध आजाराकरीता आवश्यक सोईसूविधा  उपलब्ध करून दिल्या. आमदार केराम यांनी मतदारसंघातील नागरीकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष घालून  आमदारांच्या स्थानिक विकास निधीतुन किनवट, मांडवी, माहूर या गावाकरीता प्रत्येकी १ असे एकुण ३ व  एकात्मिक प्रकल्प कार्यालयाकडुन ५ अशा एकून ८ अॅंबूलंन्स उपलब्ध करुन दिल्या असल्याने आदिवासी व डोंगराळ भागातील अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जाणे सोईचे झाले.तसेच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या खासदार निधीतून किनवटसाठी ६ माहूसाठी ३ तर मांडवीसाठी १ असे एकून १० व्हेंटीलेटर बसविण्यात येणार आहे.

  आ.केराम यांनी पूढाकार घेउन तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना प्रत्यक्ष भेटून वन्य प्राण्यांना पीण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी १५ वनतळे मंजूर करून घेतल्याने कोरोना महामारीच्या काळात रोजगार हरवलेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 

देशातील रस्त्याचा कायापालट करणारे रोडकरी अशीओळख निर्माण केलेले कार्यसम्राट केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची आ.केराम यांनी स्वतः भेट घेऊन किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील अंतर्गत रस्त्याच्या विकासासाठी विविध प्रस्ताव सादर केले आहे. ज्यामध्ये प्रमुख प्रस्ताव सारखणी ते उनकेश्वर , तलाईगुडा  रस्त्याकरीता १५० कोटी निधी प्रस्तुत करण्याची विनंती केली आहे. ज्यामुळे याभागातील नागरीकांच्या रस्त्याचे प्रश्न कायमस्वरुपी  सुटणार आहे. चिखली, बोथ, इस्लापूर, माहूर भागातील रस्त्यांकरीता १२० कोटी रुपयांचे प्रस्ताव आ.केराम यांनी सादर केले आहे.

      उर्जामंत्री नितिन राऊत यांची भेट घेऊन माहूर येथे १३२ के.व्ही च्या विद्युत केंद्राचा प्रस्ताव सादर केला आहे, जेणे करुन किनवट माहूर तालुक्यातील नागरीकांचा विजेचा प्रश्न हा कायमस्वरुपी निकाली निघणार आहे. किनवट माहूर मतदारसंघातील  शेतक-यांना आवश्यकतेनुसार रोहीत्र उपलब्ध होण्याकरीता माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या समन्वयातून वन विभाग व उर्जा विभागाशी समन्वय साधुन दिला. आहे जेणे करुन प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवले जातील.

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भेटीतून किनवट माहुर मतदारसंघात १०० कोटी रुपये किमतीचे कामे मंजुर झाले आहेत.गोकुंदा येथिल शासकीय विश्राम गृहाच्या दुरुस्ती करिता २ कोटी रुपये उपलब्ध झाले आहे.कोठारी येथिल नाल्यावर पुलाची जी अनेक वर्षापासून ची मागणी स्थानिक नागरीकांची होती ते कोठारी येथिल नाल्यावरील पुल मंजुर करण्यात आले आहे. ज्याचे काम काही दिवसात शिघ्रतेने सुरु होईल व येथिल नागरीकांचा पावसाळ्यात किनवट शी तुटना-या  संपर्काचा प्रश्न कायमचा निकाली निघणार  आहे.

      मतदारसंघातील दिव्यांगाना  स्थानिक स्वराज्य संस्था जसे नगर परिषद, पंचायत समिती च्या माध्यमातुन ५ टक्के निधी उपलब्ध करुनदिल्यामूळे दिव्यांग बांधवांना आपला उदरनिर्वाह करणे सोपे झाले .दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी जाणून  घेऊन त्या सोडविण्यासाठी  आ. केराम यांनी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिका-यांना सूचना दिल्या आहेत.

      कोरोना काळात नागरीकांच्या आरोग्याप्रती संवेदनशीलता दर्शवत आ.केराम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींनी आपआपल्या स्तरावर चौदाव्या वित्त आयोगाचा निधी वापरत आरोग्य विषयक बाबीची पुर्तता केली आहे.

      कोरोना काळात सर्वत्र दुर्लक्षित करण्यात आलेल्या व नेहमीच प्रशासकीय मदतीपासून वंचीत राहणा-या कोलाम जमातीच्या वाडीवर व वस्तीवर आदिवासी प्रकल्प कार्यालय व आदिवासी विकास महामंडळा कडुन धान्य पुरवठा आमदार केराम यांच्या सुचनेनूसार  करण्यात आला 

आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी यांच्या समन्वयातुन मतदारसंघात विविध उपाय योजनाकरिता ४० कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला यातून आदिवासी समाजाच्या विविध समस्या सोडवण्यात येणार आहे.

      किनवट ते आदिलाबाद जाणारा रस्ता हा घोगरवाडी मांडवा मार्गाची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या माध्यमातून  सोडवण्यात आल्यामुळे घोगरवाडी सारख्या अतिदुर्गम गावाला जाण्याकरीता सुसज्ज रस्ता उपलब्ध होणार आहे.तसेच हा रस्ता तेलंगाना तील आदिलाबाद जिल्ह्याला जाण्याकरीता सुकर होनार आहे. केवळ ६०० मीटरचा रस्ता तयार करण्यात आला तर आदिलाबाद येथे जाण्याकरीता २० कि.मी एवढे अंतर कमी होनार आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे 

 आमदार केराम यांनी सांगीतले.   राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, भाजप परिवाराच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत स्विकारले असूनमतदार संघातील  जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करणार असल्याचे आमदार केराम यांनी  स्पष्ट केले  आहे.

No comments:

Post a Comment

Pages