औरंगाबाद : दि.०८/०८/२०२१ रोजी भोगले ऑटोमोटिव्ह कंपनीतील कामगार सचिन गायकवाड याने कंपनीकडून होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून स्वतःला संपवण्याचा टोकाचा
निर्णय घेण्यास भाग पाडले त्या प्रकरणाची योग्यरीत्या पडताळणी करून या कामगाराला न्याय देण्यात यावे व दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी आपण घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन पीडिताला भेट द्यावी कामगाराला न्याय द्यावा अन्यथा संघटनेच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
औरंगाबाद शहरातील गरीब दुर्बल घटकांतील बहुसंख्य जनतेला रमाई घरकुल आवास योजनेचा लाभ मिळालेला नाही सदर औरंगाबाद महानगरपालिकात निधी नीची उपलब्धता नसल्यामुळे योजनाचा संत गतीने कार्यभार चालू आहे व दारिद्रय रेषेखालील बहुसंख्य कुटुंब या योजनेपासून वंचित आहेत त्या करीता आपण नीधी उपलब्ध करून द्यावा शहर आपण स्मार्ट बनवत आहोत नक्कीच पण शहरालगत असलेल्या स्लम्स (झोपडपट्टी) यांचाही विकास करणे हे आपलीच जबाबदारी आहे. आशा मागण्यांचे निवेदन सुभास देसाई
उद्योग,पालकमंत्री यांना देण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष राहुल मकासरे प्रथम कांबळे शुभम मगरे अमोल शेजवळ विकास शेजवळ आकाश जंगले रोहित साळवे आदित्य रगडे अजय आराक कमलेश दाभाडे आदी पद अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment