आंबेडकरी समूहाची बदनामी व सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी राम भोगले व इतर उद्योजकांवर कायदेशीर कारवाई करा; आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीची पोलीस आयुक्त निखिल गुप्तांकडे मागणी. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 13 August 2021

आंबेडकरी समूहाची बदनामी व सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी राम भोगले व इतर उद्योजकांवर कायदेशीर कारवाई करा; आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीची पोलीस आयुक्त निखिल गुप्तांकडे मागणी.


 औरंगाबाद   दि.१३ ऑगस्ट   :भोगले ऑटोमोटिव्ह प्रा.लि कंपनी मधील सचिन गायकवाड ह्यांच्या छळाप्रकरणी झालेल्या वादावरून आंबेडकरी समूहाविरोधात जातियद्वेषाच्या भावनेतून तेढ निर्माण करणे,औद्योगिक क्षेत्रात आंबेडकरी समूह व अनुसूचित जातीच्या बदनामी केल्याने उद्योजक राम भोगले,शिवप्रसाद जाजू,रमण आजगावकर,सतीश लोणीकर,मानसिंग पवार,रवी माच्छर,संदेश झांबड ह्यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करावी ह्या करीता पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता ह्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.



ह्यावेळी सचिन गायकवाड ह्याचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नित्यानंद भोसले,भूषण व्यवहाळकर ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर हेतुपुरस्सर पणे एकतर्फी कारवाई केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुरेंद्र मळाळे ह्यांच्या वर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करावी,त्यांच्या फोनचा CDR तपासावा अश्या मागण्या त्यात करण्यात आल्या.

उद्योजक राम भोगले ह्यांनी जातियद्वेषातुन आंबेडकरी समूह व अनुसूचित जातीच्या समाजाला टार्गेट करून उद्योग विश्वातील अनुसूचित जातीच्या कामगारांचे रोजगार धोक्यात   आणले आहेत त्यांचे बंधू नित्यानंद भोगले ह्यांनी कार्यकर्त्यांना जातीवाचक बोलून अपमान केल्याने  त्यांना रोषाला सामोरे जावे लागले परंतु राम भोगले ह्यांनी हा उद्योगविश्वावर हा हल्ला झाल्याचा कांगावा केला ह्या कडे श्रावण गायकवाड ह्यांनी पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधले

पोलीस आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे मिलिंद दाभाडे ह्यांनी सांगितले ह्यावेळी श्रावन गायकवाड, मुकुंद सोनवणे,मिलिंद दाभाडे,गौतम खरात,नागराज गायकवाड,दिपक निकाळजे,सचिन निकम,मिलिंद बनसोडे,ऍड.धनंजय बोरडे,बाळूभाऊ वाघमारे,गुणरत्न सोनवणे,ऍड.अतुल कांबळे,पवन पवार,स्वप्नील गायकवाड,अजय बनसोडे,कचरू गवळी आदींची उपस्थिती होती.    


No comments:

Post a Comment

Pages