बुद्ध,फुले ,शाहु,आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांला जीवंत ठेवणारी चळवळ म्हणजे प्रबोधन चळवळ .महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवी,गायक, शाहीर , संगीतकार व प्रबोधनकार यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सातत्याने ही चळवळ चालू ठेवली. हदगाव तालुक्यातील सरसम येथील तबलावादक,गायक तथा संगीतकार सचिन कांबळे यांनी अनेक कलावंतांना संगीताची साथ देऊन बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार व प्रचार चळवळी मध्ये मोलाचं योगदान दिले आहे.
सचिन श्याम कांबळे यांचा जन्म नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील सरसम या गावी झाला. आई निलाबाई व सामाजिक कार्यात नेहमीच सहभागी असणारे वडील श्याम कांबळे यांनी त्यांच्यावर चांगले संस्कार करून व शिक्षण देवून सचिन यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण केली. त्यांच्या घरात कोणीही कलावंत नव्हते, परंतु गावातील भजनीमंडळातील गीताचा त्यांच्या वर प्रभाव पडल्यामुळे संगीताची ओढ निर्माण झाली.
वयाच्या तिसऱ्या वर्गात असताना वडील धारी मंडळींनी गावात भजनी मंडळ तयार केले होते. गावातील वडीलधारी लोकांच्या भजनी मंडळाच्या सानिध्यात राहून संगीत ची कला अवगत केली
हळू हळू प्रगती पथाकडे वाटचाल करीत असतांना सुप्रसिद्ध संगीतकारांचे मार्गदर्शन मिळू लागले. 2006 साली प्रशांत बोंपिलवार यांच्या कडे संगीत प्रशिक्षण अवगत केले.तेथुनच त्यांच्या प्रबोधन कार्याला सुरुवात झाली. अनेक गायक कलावंतांना आपल्या प्रभावी तबला साथीने व गीतगायनातुन साथ संगत केल्याने या क्षेत्रात ओळख निर्माण केली. प्रबोधन कार्यासाठी पत्नी योगेश्रीचे नेहमीच प्रोत्साहन लाभले आहे.आता पर्यंत सचिन कांबळे यांनी भीम शाहीर प्रबोधकार साहेबराव येरेकर यांना 14एप्रिल 2019 मध्ये औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे आंबेडकर जयंती निमित्त संगीताची साथ दिली. सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे ,(खंडोबाची कारभारीन फेम )यांना भीमा कोरेगाव येथे शाहिद पूजा सकट श्रद्धांजली कार्यक्रमा निमित्य पुणे येथे संगीताची साथ दिली.प्रसिध्द कव्वाल ललकार बाबू नांदेड यांना मनमाड येथे ,आंबेडकर जयंती निमित्त शाहीर बाबुराव गाडेकर , यांना 2017 कर्नाटक मध्ये औराद येथे जयंती निमित्य, प्रसिद्ध गायक माधव वाढवे, याना,महागाव धम्म परिषद, गायक संदीप राजा,विकास राजा गायिका अश्विनी राजगुरू ,दिनकर लोणकर, सुमनताई भगत,मंगला ताई कावळे ,कविता रणवीर यांना संगीताची साथ दिली .सावली ता म्हैसा जि.निर्मल येथे गायक संतोष मंत्री यांना तबला साथ केली.कोरोना काळामध्ये जमाव बंदी असल्या कारणाने कलावंतांच्या कार्यक्रमावर बंदी आली होती त्या वेळेस फेसबुक ऑनलाईन कार्यक्रम करून बुद्ध, फुले ,शाहु, आंबेडकर विचारधारेचा गीतगायनाच्या माध्यमातून प्रसार प्रचार करुन प्रबोधन चळवळ जिवंत ठेवली . नांदेड जिल्ह्यातील प्रबोधन चळवळीतील त्यांच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांची मुबई येथील चळवळ परिवर्तनाची या फेसबुक पेज लाईव्ह चॅनल चे मुख्य संयोजक मधुकर गवई व संदीप जुंबडे यांनी नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली आहे .
त्यांच्या आवडीचे राग -
शिवरजणी, आहेर भैरवी ,पुर्या, धनश्री पहाडी,
मनपसंत गीते -
(1) बडोद्याच्या नोकरीचा दिला राजीनामा
(2) पाणी वाढ ग माय
(3) बाई जाईल दुःख तुझं सार
(4) तुझं विन भीमा हा वाटतो
(5) मुझे पढे लेखे लोगो ने धोखा दिया
त्यांच्या संचातील कलाकार -
(1) दौलत नगराळे ( हार्मोनियम वादक )
(2) लक्ष्मण कांबळे(टाळ वादक)
(3) अशोक बनसोडे( बँजो वादक)
(४) सुभाष गुंडेकर ( कोरस )
(5)त्रिरत्नकुमार भवरे (कोरस)
सन्मान
भंडारा जिल्ह्यात शाहीर माधव वाढवे यांच्या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या सांगितावर खुश होऊन डॉ.बाबासाहेबांचे पनतु राजरत्न आंबेडकर यांनी त्यांना आशीर्वाद दिला.
संदेश
गायक तथा तबला सम्राट सचिन कांबळे हे आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून फुले आंबेडकर चळवळीतील तरुणांनी संघटीत राहून समाज हिताच्या कार्याला स्वतःला वाहून घ्यावे असा संदेश देतात.त्यांच्या प्रगतीशील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद.
-महेंद्र नरवाडे,किनवट.
मो.न.7066650366
No comments:
Post a Comment