सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या उद्योजकांविरुद्ध कारवाई करा ; आंबेडकरवादी अत्याचार कृती समितीची मागणी ; मागण्या मान्य न झाल्यास १५ ऑगस्टला करणार आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 12 August 2021

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या उद्योजकांविरुद्ध कारवाई करा ; आंबेडकरवादी अत्याचार कृती समितीची मागणी ; मागण्या मान्य न झाल्यास १५ ऑगस्टला करणार आंदोलन

औरंगाबाद/ प्रतिनिधी

भोगले ऑटोमोटिव्ह प्रा.ली कंपनी,रेल्वे स्टेशन MIDC तील कामगाराने व्यवस्थापणाकडून होणाऱ्या त्रासानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नातेवाईकांनी कंपनी मालकासह अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करत राम भोगले यांच्यासह उद्योजकांनी आंबेडकरी समाजाला जातीय व्देश भावनेतून टार्गेट करुन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत आंबेडकरवादी अत्याचार कृती समितीने राम भोगले व इतर उद्योजकाविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली. श्रावण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

यावेळी जेष्ठ नेते ऍड. रमेशभाई खंडागळे,मुकुंद सोनवणे,के.व्ही. मोरे,मिलिंद दाभाडे,गौतम खरात, कृष्णा बनकर,नागराज गायकवाड,अंजन साळवे,संतोष भिंगारे,सचिन निकम,आनंद कस्तुरे,दीपक निकाळजे,प्राणतोष वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होते.

यासंदर्भात श्रावण गायकवाड म्हणाले, भोगले ॲटोमोटिव्ह प्रा.लि., रेल्वे स्टेशन एमआयडीसी येथील कंपनीमध्ये सचिन गायकवाड हा कायमस्वरुपी कामगार म्हणुन मागील १५ वर्षापासून काम करीत आहे. कंपनीचे संचालक नित्यानंद भोगले व एच.आर.भूषण व्यवहाळकर हे जातीय व्देश भावनेतून त्याला मागील दोन महिन्यापासून मानसिक त्रास देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून सचिनने ८ ऑगस्टला कंपनीमध्ये कामावर असतांना विषारी औषध घेवून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी सचीनने कंपनी व्यवस्थापनाकडे त्याला होत असलेल्या त्रासाबाबत विनंती करुन त्रास देवू नये अशी मागणी केली होती. याशिवाय औरंगाबादचे पोलीस आयुक्त, कामगार आयुक्त यांच्याकडे न्याय मागितला होता. परंतु, कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्याने विषारी औषध घेवून जीवन संपविण्याचा मार्ग निवडला. हा प्रकार सचिनच्या कुटुंबियाला समजताच त्याचे वडील उत्तम गायकवाड, आई अंजना गायकवाड व रिपब्लीकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सिध्दोधन मोरे, सचिन शिंगाडे व अन्य एक असे चार जण व्यवस्थापनास जाब विचारण्यासाठी कंपनीत गेले. त्यावेळी कंपनीचे संचालक नित्यानंद भोगले व एच.आर. भुषण व्यवहाळकर व प्लन्ट हेड मिलिंद सोनगीरकर यांनी चर्चा करण्याऐवजी जातीवाचक शब्दप्रयोग करून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थापनाच्या अशा वर्तवणुकीनंतर कार्यकर्त्यांचा संयम तुटल्याने  शाब्दीक बाचाबाची झोंबा - झोंबी झाली. कंपनी व्यवस्थापनाने पोलीसांना फोन करून बोलावुन कार्यकर्त्यांना गाडीमध्ये बसवून पोलीस स्टेशनला घेवून आले. सदरची घटना ही अदखलपात्र गुन्हयाची असतांना कंपनी व्यवस्थापनाशी संगनमत करून पोलिसांनी कार्यकर्त्यांवर चुकीचे गुन्हे केले. मुळात रिपब्लीकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सिध्दोधन मोरे यांनी जातीय वाचक शिवीगाळ केल्याबद्दल कंपनीचे संचालक नित्यानंद भोगले व एच.आर.भूषण व्यवहाळकर यांच्या विरोधात तक्रार दिली. मात्र, सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुरेंद्र मळाळे यांनी घटनेची शहानिशा न करता, गुन्हा दाखल न करता कार्यकत्यांविरुध्द एकतर्फी केल्याचा आरोप आंबेडकरवादी अत्याचार कृती समितीने केला.


आंबेडकरवादी अत्याचार कृती समितीच्या या आहेत मागण्या


राम भोगले यांनी उद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन आंबेडकरी समाजाला जातीय व्देशातून टार्गेट करुन सार्वजनिकरित्या बदनाम केले आहे. आंबेडकरी समाजाला जातीय देशातून टार्गेट करुन सामाजिक तेढ व बदनामी करणाऱ्या उद्योजक राम भोगले, शिवप्रसाद जाजु, रमण अजगांवकर, सतिश लोणीकर, मानसिंग पवार, रवि माच्छर, संदेश झांबड यांच्या विरुध्द अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कायदेशीर कार्यवाही करावी. सचिन गायकवाड यांचा जबाब घेवून कंपनी संचालक नित्यानंद भोगले, एच.आर. भुषण व्यवहाळकर आणि मिलिंद सोनगीरकर यांचे विरुध्द कायदेशीर कार्यवाही करावी. सिध्दोधन मोरे यांच्या तक्रारीवरुन कंपनी संचालक नित्यानंद भोगले एच.आर. भुषण व्यवहाळकर यांचे विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. कर्तव्यात कसुर व निष्काळजी करुन एकतर्फी कार्यवाही करणारे सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुरेंद्र माराळे यांना निलंबीत करावे. पोलीस निरिक्षक सुरेंद्र माराळे यांचे सिडीआर तपासण्यात यावे. अन्यथा समितीच्या १५ ऑगस्टला भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ उपोषण करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला.

बलराज दाभाडे,राजू मंजुळे,प्रवीण नितनवरे, काकासाहेब गायकवाड,बाळू वाघमारे, मिलिंद बनसोडे,प्रकाश निकम,रुपचंद गाडेकर,चंद्रकांत रुपेकर,प्रशांत म्हस्के,सुरेश सोनटक्के,धम्मपाल भुजबळ,राहुल वडमारे, विजय वाहुळ , गुणरत्न सोनवणे,ऍड.अतुल कांबळे,किरणराज पंडित,रमेश मगरे,स्वप्नील गायकवाड,रामराव नरवडे,अशोक मगरे,आनंद भिसे,गणेश रगडे,कृष्णा मोरे,कपिल बनकर,मुकेश खोतकर,राहुल जाधव,राहुल खंडागळे,सतीश नरवडे,अजय बनसोडे,दिनेश नावगिरे,सोमू भटकर,अनमोल लिहिणार,अमोल भालेराव,नितीन जाधव,पवन पवार,कचरू गवळी,गौतम गवळी,कैलास काळे,मुकुल निकाळजे,मनीषा साळुंखे,सखुबाई शिंगाडे,जयश्री शिर्के आदींची उपस्थिती होती




No comments:

Post a Comment

Pages