हजारो चर्मकार बांधवांना सोबत घेऊन बौद्ध धम्माची दिक्षा घेणार ; आंबेडकरी कार्यकर्ते श्रावण गायकवाड ह्यांचा संकल्प - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 10 August 2021

हजारो चर्मकार बांधवांना सोबत घेऊन बौद्ध धम्माची दिक्षा घेणार ; आंबेडकरी कार्यकर्ते श्रावण गायकवाड ह्यांचा संकल्प

औरंगाबाद   :    मागील 40 वर्षांपासून अविरतपणे आंबेडकरी चळवळीत निष्ठेने काम करणारे श्रावनदादा गायकवाड ह्यांनी धम्म परिवर्तनाची चळवळ गतिमान करण्याचा निर्धार केला असून त्यासाठी  वर्षभर बौध्द धम्माचा विचार चर्मकार,वाल्मिकी,मातंग बांधवात जाऊन पेरण्यासाठी "चलो बुद्ध की ओर" ही हाक दिली आहे.

 येत्या 14 ऑक्टोबर 2022 ला त्यांचे सर्व कुटुंब व विविध समाजातील बांधवांना घेऊन धम्मभूमी बौद्धलेणी येथे दिक्षा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले.

आज त्यांच्या 59 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा धम्मभूमी बौद्धलेणी येथे  सत्कार करण्यात आला ह्या वेळी त्यांचे कुटुंबीय पत्नी मंगलबाई गायकवाड,मुलगा अशोक गायकवाड,सत्यजित गायकवाड,मुलगी प्राजक्ता गायकवाड उपस्थित होते.

बौद्धलेणीच्या पायथ्याशी बोलताना श्रावनदादा म्हणाले की,आयुष्यात जे काही मिळाले ते केवळ बाबासाहेबांची देण आहे वयाच्या 59 व्या वर्षांपर्यंत आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून काम करत राहिलो यथाशक्ती चळवळ गतिमान करण्यासाठी काम केले चळवळीने प्रेम दिल्याने श्रावण चा श्रावनदादा गायकवाड झालो चर्मकार असून देखील मी कोणत्या जातीचा हे कोणी विचारले नाही,की दुजाभाव केला नाही परंतु आता मात्र बाबासाहेबांच्या भारत बौद्धमय करण्याच्या विचारासाठी स्वतःला वाहून घेणार आहे.

आजवर कुटुंबाने माझ्या सर्व निर्णयांना स्वीकारले धम्म परिवर्तनाच्या ह्या वाटेवर कुंटुंबही-मित्रपरिवार-नातेवाईक माझ्या सोबत आहे हे बाबासाहेबांच्या विचारांमुळे घडलेले परिवर्तन आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भंते नागसेन महाथेरो ह्यांच्याकडून सर्वांनी पंचशील ग्रहण केले.

प्रास्ताविक सचिन निकम ह्यांनी केले तर

सय्यद तौफिक,दादाराव राऊत,गुणरत्न सोनवणे,ऍड.अतुल कांबळे, प्रा.विलास लिहिणार ह्यांनी शुभेच्छापर भाषण केले.

ह्यावेळी नीरज मगरे,अक्षय जाधव,मुकेश खोतकर,ऍड.तुषार अवचार,गायक अजय देहाडे,स्वप्नील गायकवाड,अविनाश डोंगरे,प्रशांत बोरडे,जयपाल सुकाळे,विकास रोडे,दिनेश नवगिरे, सोमू भटकर,अमोल घुगे,राहुल कांबळे, गोलू गवई,राहुलराज खंडागळे,सुनील शिंदे,अतिष रुपेकर,सनी देहाडे,सिद्धार्थ दिवेकर,भगवान गायकवाड,अविनाश जाधव,अमोल घोरपडे,अमोल भिवसने आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages