“सोनियाची उगवली सकाळ..” या प्रसिद्ध गीताचे गीतकार मधुकर घुसळे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 9 August 2021

“सोनियाची उगवली सकाळ..” या प्रसिद्ध गीताचे गीतकार मधुकर घुसळे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

 


कल्याण : तालुक्यातील वालधुनी येथील बुद्धभूमी फाऊंडेशन येथे “सोनियाची उगवली सकाळ…”, “एक वरमाई रुसली” , “डोकं फिरलं या” अशा प्रसिद्ध गीतांचे गीतकार मधुकरराव घुसळे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी ख्यातनाम गायक आयु. सुरेश घोडेराव यांच्या गायनाच्या कार्यक्रम तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने लोकांना जागरूक करण्यासाठी काही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. शिवाय सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नितीन केदारे, डॉ. केवल उके, लेखक निरंजन पाटील, डॉ. सुष्मा बसवंत, संपादक करण मेश्राम यांना “महाकवी मधुकरजी घुसळे समाजभूषण” पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
यावेळी एन.डी.एम.जे. संघटनेचे मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष आयु.बंदेश सोनावणे व प्रदेश सचिव आयु.शशिकांत खंडागळे, ठाणे जिल्हा अध्यक्ष आयु.विजय कांबळे, जिल्हा सचिव आयु.विनोद रोकडे, जिल्हा सहसचिव आयु.सुनील ठेंगे, जिल्हा उपाध्यक्ष आयु.संतोष बनसोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आयु.संदेश भालेराव, कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष एड. प्रविण बोदडे, कल्याण ग्रामीण अध्यक्ष आयु नितेश गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages