जातियद्वेषातून जागा रिक्त ठेवणाऱ्या संस्थांचालकावर कारवाई करा आ.प्रणिती शिंदे ह्यांच्या कडे मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 25 August 2021

जातियद्वेषातून जागा रिक्त ठेवणाऱ्या संस्थांचालकावर कारवाई करा आ.प्रणिती शिंदे ह्यांच्या कडे मागणी

औरंगाबाद :

अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षा आ.प्रणितीताई शिंदे ह्यांची आज रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या सचिन निकम ह्यांनी भेट घेऊन संस्थाचालक,विद्यापीठ प्रशासन,सहा.संचालक कार्यालय (उच्च शिक्षण) यांच्या संगनमताने अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या जागा जाणीवपूर्वक रिक्त ठेवल्या जात असून,अनुसूचित जातीच्या राखीव जागांचे आरक्षण बदलून देण्याचे प्रकार वाढले असून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.

ह्यावेळी वाळूज येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालय येथील सहायक प्राध्यापक पदाची आरक्षित जागा जातीयद्वेषातून पात्र उमेदवार न मिळाल्याच्या बनाव करून रिक्त ठेवण्यात आली ह्याचे सर्व पुरावे सादर करून तात्काळ पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन सदरील जागा भरावी,विषयतज्ञ,प्राचार्य,सहा.संचालक कार्यालयातील दोषी ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई कारवाई ह्यासाठी विंनती करण्यात आली.


ह्यावेळी सचिन निकम,ऍड.अतुल कांबळे, प्रा.प्रबोधन बनसोडे ह्यांची उपस्थिती होती

No comments:

Post a Comment

Pages