भीमनगर ते कोलंबिया,लंडन, हार्वर्ड विद्यापीठ हे प्रत्येक आंबेडकरी विद्यार्थ्यांचे स्वप्न असावे- प्रा. डॉ सुनील अभिमान अवचार ; उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठ येथे निघालेल्या विकास तातड चा सत्कार व अभिनंदन करतांना प्रतिपादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 26 August 2021

भीमनगर ते कोलंबिया,लंडन, हार्वर्ड विद्यापीठ हे प्रत्येक आंबेडकरी विद्यार्थ्यांचे स्वप्न असावे- प्रा. डॉ सुनील अभिमान अवचार ; उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठ येथे निघालेल्या विकास तातड चा सत्कार व अभिनंदन करतांना प्रतिपादन

मुंबई : आंबेडकरी समाजातून विदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या हे शिका, संघर्ष करा व संघटित व्हा या बाबासाहेबांच्या  शिकवनीचे फलित असून ही शिकवण जागतिक चळवळ करण्यासाठी अधिकाअधिक संख्येने वंचित समाजातील विद्यार्थ्यांनी विदेशातील नामांकित विद्यापीठातून उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे असे आवाहन मुंबई विद्यापीठातील प्रा. डॉ सुनील अभिमान अवचार यांनी विकास तातड यांच्या सत्कार प्रसंगी केले. 


अमरावती येथील भीमनगर मधील रहिवासी विकास तातड यांचा सत्कार कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश व महाराष्ट्र शासनाच्या परदेशात शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्याबद्दल मुंबई विद्यापीठातील प्रा. सुनील अवचार यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी बोलतांना, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कुल, हार्वर्ड विद्यापीठ अशी जगविख्यात विद्यापीठांची नावे ही आंबेडकरी वस्तीतील घरोघरी पोहचवून आंबेडकरी नगरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी तेथे शिकायला जावे ही काळाची गरज आहे असे प्रा. अवचार म्हणाले. आंबेडकरांच्या Agitate या शिकवणुकीचे विवेचन करून Agitate म्हणजे फक्त हा रस्त्यावरचा संघर्ष नसून, agitate म्हणजे चौकटीबद्ध विचारविश्वातून बाहेर येऊन स्वतःच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी केलेले अविरत प्रयत्न होय असे म्हणाले. विकास तातड च्या शैक्षणिक संघर्षाचा उल्लेख करून एका चहा कँटीन चालवणाऱ्या व्यक्तीचा मुलगा हा कोलंबिया विद्यापीठात शिकायला जाणे म्हणजे आंबेडकरी चळवळीचा मूलगामी परिणाम अधोरेखित करतो असे मत प्रा. अवचार यांनी नोंदवले.


या प्रसंगी बोलतांना विकास तातड यांनी त्यांचा संघर्षमय शैक्षणिक प्रवास उलगडला. विद्यार्थ्यांनी फक्त मोठे स्वप्न पाहणं पर्यंत मार्यदित न राहता ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून आपल्या comfort zone मधून बाहेर येण्याची गरज असल्याचे सांगितले. कोलंबिया विद्यापीठात भारतातील उच्च शिक्षण व मागासवर्गीय समाज या बद्दल संशोधन करणार असल्याचे सुद्धा सांगितले. आपल्या यशामध्ये आई-वडील व शिक्षक यांच मोलाचं योगदान असून त्यांच्या पाठिंब्यामुळेच आपण यशस्वी झालो असे नमूद केले. 


परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून स्कॉलरशिप ची संख्या मात्र 75 आहे. आंबेडकरी तरुणांच्या वाढत्या शैक्षणिक महत्वाकांक्षा लक्षात घेऊन ही संख्या 500 करण्याची गरज असून त्यासाठी सामाजिक न्याय मंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे प्रा. अवचार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Pages