किनवट : शहरापासून पासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशपूर(ता. किनवट) येथे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतकरी दत्ता रामराव वानखेडे (वय ५५) हे शेतात काम करत असताना वन्य प्राणी अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला केला. अस्वलाने शेतकऱ्याच्या तोंडाचा लचका घेतल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.
सदर घटना वन विभागाच्या दुर्लक्षा मुळे घडली आहे, असे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.वन विभागाने जंगलाच्या भोवती कुंपण करणे गरजेचे असताना देखील वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. सदरची घटना घडल्यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त येत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments:
Post a Comment