देशातील 'टॉप २० -कुलगुरु‘मध्ये मा.डॉ.प्रमोद येवले यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 2 September 2021

देशातील 'टॉप २० -कुलगुरु‘मध्ये मा.डॉ.प्रमोद येवले यांची निवड



औरंगाबाद, दि.२ : देशातील ‘टॉप २० कुलगुरु' यांची यादी घोषित करण्यात आली असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु माननीय  डॉ.प्रमोद येवले यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्रातून केवळ एकाच कुलगुरुंना या यादीत येण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे.

    ‘युलकेज् वॉल ऑफ फेम‘ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्यावतीने ‘टॉप २० एमिनंट व्हाईस चान्सलर्स ऑफ इंडिया‘ अर्थात भारतातील उत्कृष्ट २० कुलगुरुंची यादी‘ घोषित करण्यात आली आहे. देशातील शंभरहून अधिक विद्यापीठांच्या कुलगुरुंचे नामांकन यात करण्यात आले. या संस्थेने नेमलेल्या ज्यूरींनी यातून २० कुलगुरुंची निवड केली. विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता तसेच उत्तम प्रशासन तसेच दर्जेदार संशोधन आदी बाबींवरुन सदर निवड करण्यात आली. तसेच संबंधित कुलगुरुंनी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नाची दखल या संस्थेने घेतली. डॉ.प्रमोद येवले यांनी गेल्या दोन वर्षात पेट, ऑनलाईन परीक्षा, दोन कोविड टेस्टिंग लॅब यासह अनेक प्रकल्प यशस्वी केले आहेत. तसेच दोन पेटंटही या काळात त्यांना प्राप्त झाले आहेत. दरम्यान, या निवडीबद्दल कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांचे प्र-कुलगुरू डॉ शाम शिरसाट, डॉ.जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता, सर्व संवैधानिक अधिकारी, विविथ अधिकार मंडळाचे सदस्य कर्मचारी संघटनेचे नेते डॉ कैलास पाथ्रीकर, प्रकाश आकडे, अनिल खामगावकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी  यांनीभेट घेऊन सत्कार केला.


 सहकां-याचे खंबीर पाठबळ : मा.कुलगुरु


    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दोन वर्षात सर्व सहका-यांचे खंबीर पाठबळ लाभले. शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच सर्व अधिकार मंडळांची सकारात्मक भुमिका यामुळे चांगले काम करता आले. संस्थेने घेतलेली नोंद हा आम्हा सर्व सहका-यांचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Pages