बीएनआर एफ शिष्यवृत्ती पीएचडीपर्यंत नियमित करावी ; विद्यार्थ्यांचे शरद पवारांच्या निवासस्थानी साकडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 18 September 2021

बीएनआर एफ शिष्यवृत्ती पीएचडीपर्यंत नियमित करावी ; विद्यार्थ्यांचे शरद पवारांच्या निवासस्थानी साकडे

मुंबई :  बार्टीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्र वृत्ती ही महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांत एमफिलच्या विद्यार्थ्यांना मिळते. हीच अधिछात्रवृत्ती पीएचडीपर्यंत द्यावी अशी मागणी शासनाकडे वारंवार केली आहे. यावर अद्याप निर्णय घेतला नसल्याने संशोधन विद्यार्थ्यांच्या कृती समितीच्या वतीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन  घालत मदतीची याचना केली. याच मागणीचे निवेदन इतर मंत्रीमहोदयांनाही देण्यात आले आहे. 


बीएनआर एफ 2018 च्या पात्रताधारक 194 विद्यार्थ्यांना एमफीलपर्यंतच मिळाली आहे. या अधिछात्रवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना पीएचडीपर्यंत मिळावा म्हणून अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे बार्टीच्या धर्तीवर सारथी व महाज्योतीच्या वतीने ही शिष्यवृत्ती एमफील ते पीएचडीपर्यंत दिली जाते. त्याच पार्श्वभूमीवर 2018 च्या एमफीलच्या 194 विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून ही सवलत देण्याच्या मागणीचे शरद पवारांसह  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, अमोल मिटकरी, राज्य उद्योग मंत्री आदिती तटकरे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे,  यांच्याकडे संशोधक विद्यार्थ्यांनी साकडे घातले आहे. दरम्यान यापूर्वी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या मागणीवर तत्काळ बैठक बोलावून यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. तसे बार्टीच्या अधिकाऱ्यांना आदेशितही केले होते. त्यानंतरही अद्याप बैठक घेण्यात आली नाही, आणि यावर निर्णय ही घेण्यात आला नाही. त्यामुळे यावर तत्काळ सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशीही मागणी सर्व मंत्रीमहोदयांना दिलेल्या निवेदनात केली आहे.  यावेळी कृती समितीच्या कल्पना कांबळे, भरत हिवराळे, संतोष निकाळजे, प्रिती निकाळजे, माजी नगरसेवक चेतन कांबळे, आनंद लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते , बापू सलवदे,सविता गंगावणे, छाया सौंदरमल, सारिका दळवी, सूरज साळवे आदी विद्यार्थिनी, विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages