किनवट , दि.१७ : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त शुक्रवारी(दि.१७) सकाळी ८ वाजता दिवाणी न्यायाधीश एस.बी.अंभोरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदनाचा समारंभ झाला. ध्वज वंदनानंतर पोलिस पथकाने न्यायाधीशांना मानवंदना दिली.
ध्वजवंदन कार्यक्रमानंतर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कायदे विषयक शिबिर घेण्यात आले.प्रास्ताविक एड.दिलिप काळे यांनी केले. याप्रसंगी दिवाणी न्यायाधिश एस.बी.अंभोरे यांनी कायदे विषयक जागृतीच्या संदर्भाने व मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त यथोचित माहीती दिली.यावेळी सरकारी अभिवक्ता अशोक पोटे,सहाय्यक सरकारी अभिवक्ता श्री.चव्हाण, अभिवक्ता संघाचे सचिव एड.पंकज गावंडे, सहसचिव एड.बिपिन पवार,कोषाध्यक्ष एड.सुनिल येरेकार, अभिवक्ता संघाचे माजी उपाध्यक्ष एड. मिलिंद सर्पे, एड.निलेश राठोड,वसंत जाधव ,कार्यालयीन अधिक्षक वर्षा बोल्लेनवार यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी व कोर्ट पोलिस यांची उपस्थिती होती.या समारंभासाठी उपस्थित सर्व कोविड-१९ चा प्रादुर्भाव असल्याकारणाने मास्क घालूनच कार्यक्रमास उपस्थित होते.
No comments:
Post a Comment