किनवट,दि.९ : बहुजन समाज पार्टी च्या जिल्हा प्रभारीपदी दीपक ओंकार यांची नियुक्ती बसपा चे महाराष्ट्र प्रदेश सचिव दिगंबर ढोले ,नांदेड झोन प्रभारी प्रा.डॉ. आनंद भालेराव व नांदेड जिल्हा अध्यक्ष मनिष कावळे यांनी एका पत्राद्वारे नुकतीच केली आहे.
महापुरुषांच्या विचारधारेवर आधारीत बहुजन समाज पार्टीच्या चळवळीचे काम करण्यासाठी आपली नियुक्ती करण्यात येत आहे, बसपा च्या नियमांच्या अधिन राहून तन-मन-धनाने पक्षाचे सक्रिय काम करावे,अशी अपेक्षा नियुक्ती पत्रात करण्यात आली आहे.
ओंकार यांच्या नियुक्ती बदल साहेबराव डाखोरे,श्रीकांत नागणीकर, साहेबराव नरवाडे, जयवंतराव थोरात,आत्माराम डोखारे,युवराज रिंगनमोडे,किनवट तालुका अध्यक्ष चंद्रकांत कांबळे,आश्वविन रावळे,सटवाजी सोनकांबळे, सखाराम मामा इंगोले,भीमराव सातोरे आदींनी ओंकार यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment