बार्टी : एम फिल फेलोशिप धारकांचे पी.एच्.डी. फेलोशिपसाठी आमदार संजय जी सिरसाठ यांना तिसऱ्यांदा निवेदन दवारे साकडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 9 September 2021

बार्टी : एम फिल फेलोशिप धारकांचे पी.एच्.डी. फेलोशिपसाठी आमदार संजय जी सिरसाठ यांना तिसऱ्यांदा निवेदन दवारे साकडे

 


  औरंगाबाद: बार्टीच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्र वृत्ती ही महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात एम फिल ते पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना दिली जाते मात्र ' बीएनआर एफ 2018 'च्या पात्रताधारक तिच्या 194 संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी साठी विशेष बाब म्हणून युजसी च्या नियमाप्रमाणे  व  बार्टीच्या धरतीवर सारथी  हि संस्था मराठा समाजाच्या विद्यार्थ्यासाठीआणि महा ज्योती  हि ओबीसी समाजासाठी फेलोशिप दिली जाते त्या संस्थांना पीएचडी पर्यंत फेलोशिप देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे मग अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर  अन्याय होत असल्याचे म्हटले आहे त्यातच  महाराष्ट्र विधान मंडळ अनुसुचित जाती कल्याण समिती प्रमुख आमदार प्रणिती ताई शिंदे तसेच समिती सदस्यास निवेदन दिल्याचे  म्हटले आहे. संशोधक  विद्यार्थानी नाराजी व्यक्त  केल्यानंतर आमदार संजय भाऊ सिरसाठ यांनी धनजंय जी मुंडे साहेब यांना चिफारस पत्रात एम फिल  'बीएन आर एफ 2018' च्या 194 संशोधक विद्यार्थाना पीएचडी पर्यंत फेलोशिप देण्यासंदर्भात तात्काळ बैठक आयोजीत करण्याबाबत या आधी सुध्दा दिनांक 12/07/2021 ला पत्र दिले होते त्यातच संशोधक विदयार्थ्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले  होते  आणि  दिनांक 09/09/2021 रोजी दिलेल्या   चिफारस पत्रात सुद्धा तात्काळ बैठकीचे आयोजीत करावी असे म्हटले आहे.फेलोशिप संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन संशोधक विद्यार्थाना  देण्यात आले त्या वेळी कृती समीतीच्या  कल्पना कांबळे, प्रिती संतोष निकाळजे , श्रद्धा सिरसाट , विशाखा रगडे, अरुणा सपकाळ, अनिता शिंदे, दिक्षा ढगे उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Pages