भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. वि.वा. एंगडे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 8 September 2021

भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. वि.वा. एंगडे यांचे निधन नांदेड,( प्रतिनिधी)-  येथील हर्ष नगर भागातील ज्येष्ठ नागरिक सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. वि.वा. एंगडे  यांचे आज सकाळी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. डॉ. वि.वा. एंगडे  हे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. वैद्यकीय त्याचबरोबर सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही डॉ. वि.वा. एंगडे यांनी उल्लेखनीय योगदान दिले. दिवंगत डॉ. वि.वा. एंगडे यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता सिडको येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

 

No comments:

Post a Comment

Pages