किनवट: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा जुना पुतळा निष्कासित करून त्या जागी नवीन पुतळा उभारण्यात येईल. पुतळा उभारण्यासाठी लवकरच ११ सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येईल व ही समिती पुतळा उभारण्याकामी आवश्यक ते सर्व निर्णय घेईल,असा ठराव नगर परिषदेच्या वतीने नगर परिषदेच्या सभागृहात आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या नागरिकांच्या व्यापक बैठकीत घेण्यात आला.
यावेळी मंचावर मुख्याधिकारी सर्व्हेश मेश्राम, शिवराज राघुमामा,विठ्ठलराव मच्छर्लावार,दत्ता आडे,माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, सुधाकर भोयर,इसाखान,नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,उपाध्यक्ष व्यंकट नेम्मानीवार, वैजनाथ करपुडे पाटील,साजिदखान,सुनिल पाटील, अनिल क-हाळे,अँड.पंजाब गावंडे,गजानन कोल्हे,प्रकाश राठोड, बालाजी मुरकुटे आदिंची उपस्थिती होती.
प्रास्ताविक नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी केले.सूत्रसंचालन श्रीनिवास नेम्मानीवार व चंद्रकांत दुधारे यांनी केले.यावेळी विनोद भरणे,बालाजी पावडे,आशिष क-हाळे,बाळकृष्ण कदम,मारोती भरकड,मारोती सुंकलवाड, जहिरोद्दीन खान,बापूसाहेब तुप्पेकर, अशोक नेम्मानीवार,फेरोज तंवर,अभय महाजन,शिवा क्यातमवार,किशनराव राठोड, प्रशांत ठमके, संदिप केंद्रे,विवेक ओंकार,सुनिल गरड,निळकंठ कातले,संतोष शिसले,विनायक गव्हाणे यांच्यासह
विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment