...आणि डॉ. नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीत बंद केली ‘शिदोरी’! - भूपेंद्र गणवीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 9 October 2021

...आणि डॉ. नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीत बंद केली ‘शिदोरी’! - भूपेंद्र गणवीर

 नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मोठा इतिहास आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अस्पृश्यांना बौध्द धम्माची दीक्षा दिली. आणि अहिंसक क्रांती घडवून आणली. त्या अगोदर त्यांनी स्वतः बौध्द धम्माची दीक्षा घेतली. आणि या दिनाला, त्या स्थळाला अनन्य महत्त्व आले. नागपूरचा हा जागतिक लौकिक. या निमित्त दीक्षाभूमीवर जगभरातून लोक येतात. धम्मदीक्षाही घेतात.  

   १९८० च्या दशकातील ही गोष्ट. त्यावेळेस दीक्षाभूमीवर येणा-यांमध्ये गोरगरिबांचा भरणा जास्त होता. दोन-तीन दिवसांची शिंदोरी बांधून आंबेडकरी जनता त्यावेळी येत असे. या काळात भाकरी सुकून जाई, शिळे अन्न खावून लोकांचे आरोग्य बिघडत असे. तेव्हा अनेकांच्या तोंडून “बिचारे”, हा शब्द बाहेर पडत असे. हे दृष्य वेदनादायी होते. अनेक जणांनी या काळात बघ्याची भूमिका घेतली, ही परिस्थिती बदलण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. 

मात्र एक तरूण याला अपवाद ठरला. तो तरूण म्हणजे डॉ. नितिन राऊत. कनवाळू नितीन राऊत हे बघून व्यथित झाले. त्यावर मार्ग काढण्याचा त्यांनी संकल्प केला. त्यांनी मित्रांसोबत संवाद साधला. बैठक झाली. कल्पना सर्वांना आवडली. या उपक्रमाला त्यांनी नाव दिले ‘संकल्प’.

 या संकल्पनेला सर्वांची साथ मिळाली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. लोकांशी संपर्क साधला. बाबासाहेबांवर जीवापाड प्रेम करणारे आपलेच बांधव असे उपाशी तापाशी राहतात, खराब झालेले अन्न खातात हे टाळण्यासाठी या सर्वांना ताजे व सकस भोजन मिळायला हवे, ही बाब त्यांनी सर्वांना समजावून सांगितली.

१९८६ पासून त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम अविरित सुरु आहे. हळूहळू ती चळवळ बनली. हजारो मदतीचे हात पुढे आले आणि या उपक्रमाशी जोडले गेले. दर्जेदार, पौष्टिक नाश्ता, जेवण देणारे स्टॉल लागू लागले. त्या स्टॉल्सवर साधा गावकरी व सुटाबुटातील माणूसही दिसू लागला. प्रत्येक माणूस रांगेत येतो, कोणतीही तक्रार नाही. उपास कोणाला घडत नाही. हा विश्वास लोकांमध्ये वाढला आणि त्यातून शिदोरीचे गाठोडे आणणे बंद पडले. हे लोण मुंबईच्या चैत्यभूमीवर गेले. महु येथेही डॉ. राऊत यांच्या या उपक्रमाची अंमलबजावणी होऊ लागली.

या उपक्रमातून नितीन राऊत यांचे वेगळेपण समाजात उठून दिसू लागले. त्यांचे नाव दीक्षाभूमीवर येणाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यात गेले. आंध्र, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, प.बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश आदी राज्यात गेले. संकल्पच्या माध्यमातून ते केवळ भोजनच देत नव्हते तर त्यांच्यासोबत संवादही साधत होते. विचारांचे आदान प्रदान करीत होते. यातून त्यांना देशभरातील आंबेडकरी सामाजाच्या, दलित समाजाच्या व्यथा व वेदना कळू लागल्या.  त्यांचे प्रश्न समजू लागले. या अनुभवाचाच त्यांना आज अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्षपद सांभाळताना उपयोग होतोय. दीक्षाभूमीतून त्यांचे नाव आज देशपातळीवर पोहोचले.

No comments:

Post a Comment

Pages