शक्यतोवर गावातील तंटे तंटामुक्त समितितच मिटवा: न्यायमूर्ती एस.बी.अंभोरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 10 October 2021

शक्यतोवर गावातील तंटे तंटामुक्त समितितच मिटवा: न्यायमूर्ती एस.बी.अंभोरे

किनवट दि.१० : कुणाचे चांगले नाही करता आले तर,किमान  कुणाचे वाईटही करु नका. वाद करुच नका ,वाद झाल्यास तो गावच्या तंटामुक्त समितित मिटवा.भांडणात मजा नाही.भांडण झाल्यास मध्यस्तामार्फत मिटवून घ्या.संगत करतांना चांगल्या माणसाची संगत करा,असे आवाहन न्यायमूर्ती एस.बी.अंभोरे यांनी केले.

   तालुका विधी सेवा समिती व अभिवक्ता संघाच्या वतीने आझादी का अम्रत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत रविवारी (ता.१०) मांडवा (कि.)ता.किनवट)येथे सकाळी साडे दहा वाजता न्यायमूर्ती एस.बी.अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम पंचायत प्रांगणात कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

   यावेळी तालुका विधी सेवा समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, समितीच्या सदस्या एड.दिव्या पाटील,एड.शामिले,अभिवक्ता संघाचे सचिव एड.पंकज गावंडे,माजी उपाध्यक्ष एड.एम.यु.सर्पे यांनी विविध कायद्यांची तोंड ओळख करून दिली.

प्रास्ताविक विधी सेवा समितीचे सदस्य एड.दिलिप काळे यांनी केले.सूत्रसंचालन विठ्ठल चिठ्ठेवार यांनी केले,तर अभार प्रदर्शन प्रशासक एस.के तिरमनवार यांनी केले.


   कार्यक्रमास सहाय्यक गट विकास अधिकारी डी.बी.राठोड,अभिवक्ता संघाचे कोषाध्यक्ष एड.सुनिल येरेकार,एड.उदय चव्हाण, एड.दिलिप कोट्टावार,एड.रुपेश पुरुषोत्तमवार,श्री.मिसलवार व प्रा.सुबोध सर्पे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  यावेळी न्यायालयीन कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह महीला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages