आंबेडकरी संघटनांचा विद्यापीठात हल्लाबोल ; भरपावसात जोरदार निर्दशने नाकर्त्या विद्यापीठ प्रशासनाचा धिक्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 1 October 2021

आंबेडकरी संघटनांचा विद्यापीठात हल्लाबोल ; भरपावसात जोरदार निर्दशने नाकर्त्या विद्यापीठ प्रशासनाचा धिक्कार

 

औरंगाबाद :  अनेक वर्षांपासून नामांतरासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या नामांतर शहिदांच्या स्मारकासाठी विविध संघटना पाठपुरावा करत असून नामांतर आंदोलनाच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या लोकांचा स्मारकासाठी गठीत केलेल्या समितीत समावेश करून विद्यापीठाने स्मारकाचे काम रेंगाळत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न चालवला आहे ह्याच निषेध करण्यात आला. आरक्षण डावलून केलेल्या नियमबाह्य नियुक्त्या,कलंकित प्रतिमा असलेल्या PRO संजय शिंदे,डॉ.गीता पाटील,डॉ.प्रशांत अमृतकर सारख्या अधिकारी,प्राध्यापक,कर्मचाऱ्यांना अभय पुरवणे,आर्थिक भाराच्या नावाखाली विविध विभाग बंद पाडणे, नियमबाह्य पद्धतीने शुल्कवाढ करून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यापासून परावृत्त करणे,मनमानी पद्धतीने वेतन देणे-सेवेत कायम करणे,सामाजिक तेढ निर्माण करणारे उपक्रम राबवणे,संशोधक विद्यार्थ्यांना पैशांची मागणी करणाऱ्या प्राध्यापक-विभागप्रमुख ह्यांच्या विरोधातील न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात-चौकशीत अपूर्ण माहिती पुरवून त्यांना अभय पुरविणे,परीक्षेच्या निकालात-मूल्यांकनातील गैरप्रकार,वसतिगृहातील अपुऱ्या सोयीसुविधा  असे अनेक नियमबाह्य प्रकार सातत्याने विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे घडत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.  


विद्यापीठाच्या प्रतिमेला तडा जात-शैक्षणिक क्षेत्रात बदनामी होत आहे. प्रशासनाचे प्रमुख म्हणून ह्या बाबी कडे आपले जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे याचा धिक्कार करण्यात आला. संशोधक विद्यार्थ्यांला पैसे मागणारे डॉ.अमृतकर ह्यांच्या खटल्यामध्ये जाणीवपूर्वक त्यांना मदत करण्या हेतून मूळ तक्रार,महत्वाचे पुरावे हे कोर्टात सादर न केल्याने डॉ.अमृतकर यांस पुन्हा सेवेत पूर्ववत करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली असल्याने ह्याचा जाब विचारण्यात आला.


 डॉ.गीता पाटील ह्यांनी संशोधक परदेशी विद्यार्थ्यांना पैशांसाठी नाहक त्रास देऊन आंतरराष्ट्रीय स्थरावर विद्यापीठाची लक्तरे टांगली आहेत,विविध कंत्राटदार हे नियमबाह्य पद्धतीने दर्जाहीन कामे करून,कंत्राटी कुशल-अकुशल-सफाई कामगार,सुरक्षा रक्षक ह्यांना मनमानी पद्धतीने कामावरून कमी करणे, किमान वेतन कायद्याचा भंग करणे असे प्रकार करून कामगारांचे शोषण करत आहेत.


विद्यपीठात नवनवीन अभ्यासक्रम-विभाग सुरू करण्याऐवजी विविध विभाग बंद करण्यासाठी अभ्यासक्रम व विभाग बंद करण्याचा प्रकार करण्यात येत अशे त्यात विविध अधिकार मंडळातील जातीयवादी सदस्य दबाव निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला.विविध आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने विविध मागण्या प्रलंबित असल्याने कुलगुरूंच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली.


दि.१६ ऑक्टोबर पासून सर्व संघटनांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.


■ संशोधन मार्गदर्शिका ची मान्यता रद्दकेल्यानंतर परदेशी विद्यार्थ्यांना पैशाची मागणी करून विद्यापीठाची बदनामी करणाऱ्या डॉ.गीता पाटील यांच्यावर फसवणूकीचे गुन्हे दाखल करून बडतर्फ करा त्यांच्याकडील संशोधक विद्यार्थ्यांना इतर मार्गदर्शकाकडे वर्ग करण्यात यावे.


■ बोगस अनुभव प्रमाणपत्राआधारे नौकरी मिळवणारा स्त्री लंपट जनसंपर्क अधिकारी (PRO) संजय शिंदे यास तात्काळ बडतर्फ करा.


■ विद्यापीठ फंडातील जागा भरताना आरक्षणाचे नियम पाळण्यात यावे.


■ नामांतर शहीद स्मारकाचे काम तात्काळ सुरू करा,नामांतर लढ्यात प्रत्यक्ष सहभागी कार्यकर्ते विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी ह्यांचा समावेश समितीत करण्यात यावा, स्मारकासाठी 10 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात यावी.


■ सुरक्षा रक्षक- सफाई कामगार ह्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे/ नियमबाह्य वेतन करणाऱ्या ठेकदारावर कारवाई करावी.


■ 23 ऑगस्ट ला व्यवस्थापन परिषदेने विविध विभाग व अभ्यासक्रम बंद करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा.


■ विद्यापीठातील सर्व वसतिगृह सुरू करणे.


■ कुशल अकुशल कर्मचारी ह्यांना विद्यापीठाच्या सेवेत एकत्रित वेतनावर सामावून घेणे.


या  मागण्या निवेदनात केल्या आहेत.


ह्यावेळी श्रावण गायकवाड, डॉ.शंकर अंभोरे,डॉ.अनिल पांडे,देवानंद वानखेडे,नागराज गायकवाड,डॉ.किशोर वाघ,डॉ.अरुण शिरसाठ,सचिन निकम,गुणरत्न सोनवणे,प्रकाश इंगळे,राहुल वडमारे,दीपक निकाळजे,अरविंद कांबळे,बाळू वाघमारे,प्रा.सिद्धोधन मोरे,चंद्रकांत रुपेकर,प्राणतोष वाघमारे,आनंद कस्तुरे,लोकेश कांबळे, सचिन भुईगळ, डॉ.राहुल तायडे,सागर प्रधान,तुषार अवचार,सम्यक सर्पे,नारायण खरात,अनामी मोरे,भीमराव वाघमारे,राहुल खंडागळे,सुनिल शिंदे,चरण जाधव,भागवत चोपडे,रामेश्वर काबडे, नागसेन वानखेडे,विकास रोडे,प्रा.शिलवंत गोपनारायण,अविनाश सावंत,नितीन जाधव,नालंदा वाकोडे,विजय थोरात,अमोल घुगे,कचरू गवळी,अविनाश जगधने अनिल दिपके,संघर्ष साळवे,संदीप तुपसमुद्रे,हर्षपाल खडे,प्रशांत वाकळे, प्रवीण हिवाळे,विशाल आठवले,ऍड चंद्रशेखर बिरडे, बळीराम चव्हाण,रोहित जोगदंड,प्रीतम मोरे,मयुरी जोगदंड,धम्मप्रिया गायकवाड,जयश्री शिरके,अक्षता शिरके,सुलभा भालेकर आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages