महार रेजिमेंटची शौर्यगाथा व जाज्वल्य इतिहास - निलेश वाघमारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 1 October 2021

महार रेजिमेंटची शौर्यगाथा व जाज्वल्य इतिहास - निलेश वाघमारे

 जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही --डॉ.बाबासाहेब आंबेडकर.   

 संपूर्ण भारतात व तसेच महार समाज सर्वत्र कमी अधिक प्रमाणात वास्तव्य करत असलेला दिसतो परंतू महार समाज (आजचा बौध्द)महाराष्ट्रात  अधिक पटीने पाहायला मिळतो 

महार समाज -

महार हा समाज पुरातन काळापासून अस्तित्वात असल्याचे दाखले मिळतात महाराष्ट्रातील  काही प्रमुख जातीपैकी महार ही लोकसंख्येच्या दृष्टिने मोठी अशी एक जमात वास्तव्य करीत आहे. येथे राहणाऱ्या लोकांची शरीर प्रकृती काटक व कष्टाळू आहे शौर्य ,धाडस, प्रामाणिकपणा ,त्याग, औदार्य ही त्यांची स्वभाव वैशिष्टे आहेत पहिला युरोपियन विद्वान व संशोधक जॉन विल्सन यांनी आपल्या india Three thousan year's या ग्रंथात सर्वप्रथम या विषयावर आपले विचार मांडताना म्हणतात , महाराष्ट्र हा देश महारांचे राष्ट्र होय. त्यानंतरच महारासंबंधी संशोधनाला चालना मिळाली त्यानंतर मोल्सवर्थ , अलेक्झांडर,, रॉबर्टसन, डॉ श्रीधर केतकर (ज्ञानकोशकार, व समाजशास्त्रज्ञ ) , महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ बाबासाहेब आंबेडकर. यांसारख्या विद्वानांनी ही महार समाज याविषयी संशोधन व या समाजाचा इतिहास जगापुढे मांडण्याचे काम केले आहे. 

 शिवकाळ व पेशवाई-

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा महारांनी आपले कौशल्य आपली चुणूक दाखवल्याचे दाखले इतिहासात मिळतात शिवकाळ हा तसा समता प्रस्थापित करणारा काळ म्हणून ओळखला जातो. याच काळात शिवाजी महाराजांनी या समाजाला आपल्या स्वराज्यात समावेश करून यांच्या हाती मोठ्या जबाबदारीची कामे दिली व या समाजाने आपले बुद्धी कौशल्य स्वराज्याच्या हितासाठी वापरून आपले    सर्वस्व महाराजांप्रती आदरभावाने अर्पण केले नंतर पेशवे काळातही महारांचा समावेश होता पेशवाईतही महारांनी अनेक ठिकाणी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे परंतू एका ठिणगीने महारांच्या स्वाभिमानाला धक्का बसला आणि दुसऱ्या बाजीरावाच्या सैन्याच्या विरोधात इंग्रजांच्या बाजूने भिमकोरेगाव सारखा रणसंग्राम घडविला व तेथूनच महार समाजाच्या लष्करी सेवेचे कार्य सुरू झाले.

 महार रेजिमेंट-

पूर्वी महार समाजाने केलेल्या लष्करी कार्याबद्दल इंग्रजांनी त्यांचा समावेश लष्करात करुन घेतला  नंतर काही काळानंतर अजून हया समाजातल्या लष्करी सैनिकांची  भरती बंद केली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या विद्वानांने आपल्या बुध्दीवैभवाने इंग्रजांच्या या बाबीवर टीकास्त्र सोडले व इंग्रजांसाठी महार समाजाने केलेल्या कार्याची त्यांना आठवण करून दिली व अश्या पद्धतीने इंग्रजांनी लष्करात महार सैनिकांची भरती कायमची चालु केली ते आजतागायत दिसुन येते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्नांनी महार सैनिकांसाठी कायमची लष्कर भरती चालु करण्याच्या कार्याला यश मिळाले व १ऑक्टोंबर १९४१ रोजी महार रेजिमेंटची पुनर्स्थापना करण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांच्या अथक प्रयत्नांत महार रेजिमेंटचे निवृत्त अधिकारी सोबत होते स्वतंत्र महार रेजिमेंटच्या स्थापनेनंतर त्यांच्या साहस ,कर्तव्यनिष्ठा व बलिदानामुळे अल्पावधीतच भारतीय सैन्य दलात मानाचे अढळ स्थान प्राप्त झाले व देशाला व भारतीय सैन्याला अवर्णनीय कीर्ती प्राप्त करून दिली या जमातीचा गौरवशाली पराक्रमाचा एक मोठा इतिहास आहे पश्चिम व मध्य भारतातील या जमातीने आपले अतुलनीय शौर्य १८१८साली              भीमाकोरेगाव , १८२६ काठीयावाड, १८४६ साली मुलतान, १८८० साली कंदाहार येथे दाखवले १९४१ साली या गौरवशाली परंपरेला संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाले महार रेजिमेंटच्या स्थापनेने व्हॉईसरॉयच्या युद्ध सल्लागार समितीवर असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रयत्न यामागे होते १९४६ साली महार रेजिमेंट ही मशिनगन रेजिमेंट म्हणून ओळखली जाऊ लागली महार रेजिमेंटने १९४१ च्या दुसऱ्या महायुद्धात बर्मा, पर्शिया, इराक, तसेच १९४७-४८ च्या काश्मीर युद्धात १९६१ च्या गोवा मुक्तीसंग्रामात १९६१ च्या भारत चिन युद्धात १९६५ व १९७१ च्या भारत पाक/ बांगलादेश मुक्ती संग्रामात तसेच नागालँड ,मिझोराम येथील बंडखोरांच्या कारवाईत अतुलनिय शौर्य गाजवीले परदेशातील कोरिया, कांगो, गाझा, तसेच १८८७ मध्ये श्रीलंका येथे उत्कृष्ट कामगिरी बजावली काश्मिरच्या युद्धात उत्तर जैरिया, तीलकपुर, महाडीपुर(१९६५) येथे केलेल्या पराक्रमाबद्दल महार रेजिमेंटला पाच बॅटल ऑनरनी सन्मानित करण्यात आले आहे.१परमवीर चक्र, ४महावीर चक्र, २९विरचक्र , १किर्ती चक्र, १२शौर्य चक्र, २२विशिष्ट सेवा पदक, ६३सेना पदक महार रेजिमेंट च्या नावावर आहेत अश्या या महान महार रेजिमेंट च्या कार्यास व अतुलनीय शौर्यास सलाम..


- निलेश शंकरराव वाघमारे ८१८०८६९७८२ (इतिहास संशोधक)

No comments:

Post a Comment

Pages