प्रा प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली समाज कल्याण विभाग औरंगाबाद येथे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी निदर्शने - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 29 September 2021

प्रा प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली समाज कल्याण विभाग औरंगाबाद येथे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी निदर्शने

औरंगाबाद दि 28 :  गेले  अनेक दिवसा पासून  समाजकल्याण कडून विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्वाधार जमा झालेली नाही विद्यार्थी या लॉकडाऊन मुळे फार बिकट परिस्थितीत आहेत अश्या परिस्थितीत शिक्षण कसे द्यावे याची फार मोठी चिंता हि पालकांना व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पडली आहे म्हणून जे सरकार मुलांना एक आधार म्हणून स्वाधार योजना सुरु केली  आहे स्वाधार चे पैसे तत्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करणात यावे . महाराष्ट्र शासनाने खरतर विद्यार्थ्यांच्या हित बघून निर्णय घ्यावा.याकरिता सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने विभागीय  समाजकल्याण आयुक्त कार्यालय समोर भव्य निदर्शने करण्यात आले.

2019-20 च्या शैक्षणिक वर्षातील राहिलेली स्वधार योजनेची रक्कम विद्याथ्र्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात यावी.

 2020-21 च्या शैक्षणिक वर्षातील स्वधार योजनेतील नवीन अर्ज मागवून तात्काळ एक

महिन्याच्या आत विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्षभराची रक्कम वर्ग करण्यात यावी.

2021-22 या चालू शैक्षणिक वर्षाचे नवीन अर्ज मागविण्यात यावे. 4) प्रलंबित भारत सरकार शिष्यवृती विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ अदा करण्यात यावी.

 मागील सरकारने महाराष्ट्रातील १३५०० हजार मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला होता. त्यापैकी २३०० मराठी शाळा बंद केलेल्या शाळा तात्काळ सुरू करण्यात याव्यात

नविन शैक्षणिक धोरण लागू करू नये.

 बार्टी तर्फे देण्यात येणारी फेलोशिप एम. फिल ते पीएच. डी अशी पाच वर्षे देण्यात यावी.

 स्वाधार योजनेचे मानधन हे ६००००रु वरून ७५०००रू करण्यात यावे ,

2018-19 मध्ये एम. फिलच्या विद्यार्थांना मिळालेल्या फेलोशिपमध्ये सातत्य ठेवून पीएच. डी साठी चालू ठेवावी ,

स्वाधार योजनेची टक्केवारीची अट शिथिल करण्यात यावी ,

 शासकीय वसतिगृह तात्काळ सुरू करण्यात यावीत.  एम. फिल च्या दोन्ही वर्षा साठी स्वाधार देण्यात यावी ,

 प्राध्यापक भरती तात्काळ सुरू करण्यात यावी,

 MPSC ,UPSC राहिलेला निर्वाह भत्ता तत्काळ जमा करण्यात यावा  या प्रमुख मागण्यांसाठी

विद्यार्थ्याच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात अन्यथा 7 ऑक्टोबर 2021 नंतर आम्ही तीव्र स्वरूपाचा मोर्चा काढणार असल्याचे प्रा. प्रकाश इंगळे यांनी  सांगितले .

यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनास जाग आणण्यासाठी घोषणाबाजी करत  कार्यलयीन परिसर दणाणून सोडला. त्यानंतर समाज कल्याण अधिकारी यांना  निवेदन देण्यात आले. 



प्रा.प्रकाश इंगळे (महाराष्ट्र महासचिव, सम्यक विद्यार्थी आंदोलन)  , अँड नागसेन वानखेडे,  ,संकेत कांबळे , अनिल दिपके, रोहित जोगदंड, ऋषिकेश कांबळे, अमोल घुगे,अविनाश सावंत, रविंद्र गवई, भिमराव वाघमारे , भागवत चोपडे,  रामेश्र्वर कबाडे पाटील, संदीप तूपसमुद्रे,बळीराम चव्हान, सिध्दांत सोनवणे,उमेश वाघ, हर्षपाल खाडे, सोनाजी ,गोलू गवई, अनिल जाधव, अक्षय देहाडे ,सागर डुकरे,सचिन वाघमारे, नितीन फंदे,जयश्री शिर्के, मयुरी जोगदंड, भुषण चोपडे , वाल्मीक वाघ, स्वप्निल काळे,  संतोष अंभोरे, नलादा वाकोडे, प्रशांत वाकळे प्रवीण हिवाळे, सोनाजी गैवई, नितीन सदावर्ते ज्ञानेश्वर राठोड, रवी खिल्लारे, राहुल कांबळे जय वाकळे यांची उपस्थिती होती .

No comments:

Post a Comment

Pages