पदवी - पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या निकालातील गोंधळ दूर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा- रिपब्लिकन विद्यार्थी सेना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 25 October 2021

पदवी - पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या निकालातील गोंधळ दूर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा- रिपब्लिकन विद्यार्थी सेना

औरंगाबाद :  डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने कोरोना च्या प्रादुर्भावामुळे परीक्षा घेण्याची अपरिहार्यता लक्षात घेऊन कला , वाणिज्य, व विज्ञान विद्याशाखेच्या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आल्या होत्या परंतु , सदरील परीक्षेच्या निकालात मोठा गोंधळ उडाल्याने अंतिम वर्षाच्या हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक  भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . या बाबत विद्यार्थ्यांनी तक्रार वजा   विनंती अर्ज महाविद्यालयाच्या  मार्फत विद्यापीठाकडे सादर केले आहेत. परंतु सदरील निकाळातील गोंधळ दूर करण्याच्या दृष्टीने कुठलेही सकारात्मक कृती विद्यापीठाकडून होत नसल्याने हजारो विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या अक्षम्य चुकांचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसत आहे. शिवाय अंतिम वर्षाच्या निकालात मोठा गोंधळ असतांना विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने निकालाचे पुनरमूल्यांकन करणारी कुठलीच यंत्रणा उभारली नसल्याने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान   होण्याची दाट शक्यता आहे , आक्षेप असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या निकालाचा गोंधळ दूर करा  अन्यथा रिपब्लिकन विद्यार्थी सेना व विद्यार्थ्यांच्या वतीने या विरोधात लोकशाही मार्गाचा अवलंब करण्यात येईल असा इशारा सचिन निकम , अतुल कांबळे,प्रबोधन बनसोडे ,गुरू कांबळे , प्रवीण हिवराळे, सागर ठाकूर, सागर प्रधान यांनी दिला आहे .

No comments:

Post a Comment

Pages