'मिशन कवचकुंडल’ अंतर्गत कोरोना लस घेण्यास सर्वांना प्रवृत्त करावे - तहसीलदार डॉ.मृणाल जाधव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 11 October 2021

'मिशन कवचकुंडल’ अंतर्गत कोरोना लस घेण्यास सर्वांना प्रवृत्त करावे - तहसीलदार डॉ.मृणाल जाधव

किनवट, दि.11,  :  विविध पद्धतीने लोकांच्या मनातील भीती नाहीशी करून, त्यांना कोविड लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे आणि कोरोना लसीकरण विशेष मोहीम ‘मिशन कवचकुंडल’ अंतर्गत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून या लढाईत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार तथा इन्सिडंट कमांडर डॉ.मृणाल जाधव यांनी केले.


        जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी चलचित्रवाणी बैठकीत दिलेल्या आदेशानुसार सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात आयोजिलेल्या ‘ब्लॉक टास्क फोर्स’ च्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी गट विकास अधिकारी सुभाष धनवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती कचकलवाड, पालिका अधीक्षक चंद्रकांत दुधारे, सय्यद अजहरअली सय्यद ताहेरअली, मिडिया समन्वयक उत्तम कानिंदे, डॉ. मनोहर शिंदे, डॉ. संतोष गुंटापेल्लीवार आदींची उपस्थिती होती.


          पुढे बोलतांना डॉ. जाधव म्हणाल्या, जिल्हाधिकारी महोदयांनी दोन लस घेतलेल्यांना राशन दुकानात प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रकारे विविध अधिकारी-कर्मचारी यांनी आपणांकडील लाभाच्या योजनांचा लाभ देतांना सुद्धा अशा क्लृप्त्या वापराव्या व मिशन मोडवरील लसीकरण मोहीम शंभर टक्के पूर्ण करून घेण्यास सहकार्य करावे. कोरोना लस ही शरीरात सैनिकासारखं काम करणार आहे. कोविड विषाणूवर मात करण्यासाठी लस अत्यंत महत्वाची आहे. कुटुंब प्रमुखांनी सर्वप्रथम लस घ्यावीच; परंतु परिवारातील पात्र सर्व सदस्यांना सुद्धा लस घेण्यास नेऊन संपूर्ण कुटुंब संरक्षित करून घ्यावं. अशाप्रकारे सर्व लोकांपर्यंत जाऊन सर्व कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, सर्व  विस्तार अधिकारी ( ग्राम पंचायत / आरोग्य / शिक्षण ), केंद्र प्रमुख, शासकीय, खासगी, जिल्हा परिषद शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस या सर्वांनी आपापल्या कार्य क्षेत्राच्या ठिकाणी कोरोना लसीकरणाची जनजागृती करावी,  लस घेण्यास लोकांना प्रवृत्त करावे. तसेच गावपातळीवरील लसीकरणास नियुक्त डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर यांचेशी प्रत्यक्ष संपर्क करून कार्य करावे. असेही त्यांनी सांगितले.


         क्षेत्रिय अधिकारी व सर्व कर्मचार्‍यांनी शहरातील प्रत्येक दुकान, व्यावसायिक आस्थापना येथे सर्वांनी लस घेतल्याची खात्री करावी. कोविड नियमाचे उलंघन आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करावी. तसेच शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन करावे. कोरोना लस ही आपल्या शरीराची कवचकुंडले आहेत हे पटवून वार्डातील लोकांना त्या-त्या भागाचे नगरसेवक, समाजसेवक, शिक्षक यांचे मार्फत लस घेण्यास आणावे, असे आवाहनही पालिका मुख्याधिकारी या नात्याने करते, असे त्यांनी म्हटले.

No comments:

Post a Comment

Pages