किनवट,दि.११ : तालुका :
विधी सेवा समिती व अभिवक्ता संघाच्या वतीने आझादी का अम्रत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत सोमवारी(दि.११) गोकुंदा(ता.किनवट) येथे सकाळी साडे अकरा वाजता तालुका विधी सेवा समितीचे सदस्य व वकील संघाचे माजी सचिव एड.दिलिप काळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम पंचायत प्रांगणात कायदेविषयक शिबिर घेण्यात आले.
यावेळी तालुका विधी सेवा समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष के.मुर्ती यांनी प्रास्ताविक केले. एड.दिपा सोनकांबळे व एड. एम.यु.सर्पे यांनी विविध कायद्यांची तोंड ओळख करून दिली.
सूत्रसंचालन व अभार प्रदर्शन ग्राम विकास अधिकारी पी.व्ही.रावळे यांनी केले.
कार्यक्रमास सहाय्यक गट विकास अधिकारी बी.बी.राठोड,अभिवक्ता संघाचे सचिव एड.पंकज गावंडे, कोषाध्यक्ष एड.सुनिल येरेकार,जी.एस.वाव्हळे, सामाजिक कार्यकर्त्या प्रविण, पोलिस कर्मचारी सुभाष दोनकलवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
यावेळी श्री.मिसलवार, वाहन चालक कागणे,शेख मकदुम, जमुना राठोड,कविता गोनारकर,विशाखा कांबळे, उमरेबाई यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक, महीला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment