डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन (7 नोव्हेंबर 1900) ; "विद्यार्थी दिन" - बालासाहेब लोणे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 6 November 2021

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन (7 नोव्हेंबर 1900) ; "विद्यार्थी दिन" - बालासाहेब लोणे

    7 नोव्हेंबर 1900 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या तेंव्हाचे गव्हर्नमेंट इंग्लिश मेडियम हायस्कूल राजवाडा चौक, सातारामध्ये (आताचे प्रतापसिंह हायस्कूल ) या शाळेतील  इंग्रजी पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. गव्हर्नमेंट इंग्लिश मेडियम हायस्कूल राजवाडा चौक, सातारामध्ये (आताचे प्रतापसिंह हायस्कूल ) या शाळेत ते 07 नोव्हेंबर 1900 ते 1904 पर्यंत म्हणजेच चौथी इंग्रजीपर्यंत येथेच शिकले. या शाळेच्या प्रवेश निर्गम रजिस्टरच्या अनुक्रमांक १९१४ वर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव असुन या रजिस्टरच्या उपरोक्त अनुक्रमांकावर भीमराव रामजी आंबेडकरांची स्वाक्षरी आहे.  प्रस्तुत शाळेने हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने मोठ्या गौरव व अभिमानाने जतन व संरक्षण करून ठेवला आहे.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश हा तमाम भारतीय, बहुजन, दलित,आदिवासी, वंचित, दुर्बल, भटके व गावकुसा बाहेरच्या समाज घटकांसाठी यांच्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश हा उपरोक्त सर्वांच्या मुक्ती, शिक्षण व प्रगतीच मार्गदाता आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर अति उच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही त्यांनी आजन्म स्वतःला विद्यार्थी मानले. आयुष्याच्या शेवटापर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर  १८-१८ तास अभ्यास करायचे आणि ज्या ज्या संस्थेत शिकले त्या शिक्षण संस्थेतून एक कुशाग्र, बुद्धीमान, आदर्श विद्यार्थी म्हणूनच बाहेर पडले.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनाचे स्मरण व्हावे म्हणून, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी, यासाठी शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून महाराष्ट्र शासनाने 2017 सालापासून दरवर्षी 07 नोव्हेंबर हा दिवस "विद्यार्थी दिवस" म्हणून घोषित केला.

        आपणां सर्वांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश व विद्यार्थी दिनाच्या खूप खूप मंगल कामना. 

       - बालासाहेब लोणे

No comments:

Post a Comment

Pages