नांदेड : पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी निमित्त जाणाऱ्या भक्तां करीत दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाने दोन विशेष गाड्या चालणार
१. गाडी संख्या ०७५०१ आदिलाबाद ते पंढरपूर विशेष गाडी - हि गाडी दिनांक १४ नोव्हेंबर रोजी ( रविवारी ) आदिलाबाद रेल्वे स्थानकावरून दुपारी १४.०० वाजता निघेल आणि किनवट, बोधडी, धानोरा, सहस्रकुंड, हिमायत नगर, हदगाव रोड, भोकर, मुदखेड, हुजूर साहिब नांदेड, पूर्णा, परभणी, परळी, घटनांदूर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बारशी, कुर्डुवाडी मार्गे पंढरपूर येथे दिनांक १५ नोव्हेंबर ला सकाळी ०८.०० वाजता पोहोचेल.
२. गाडी संख्या ०७५०२ पंढरपूर ते नांदेड विशेष गाडी : हि गाडी दिनांक १५ नोव्हेंबर रोजी (सोमवारी) पंढरपूर रेल्वे स्थानकावरून सकाळी ११. ५० वाजता सुटेल आणि परळी, परभणी मार्गे नांदेड येथे रात्री २३. ३० वाजता पोहोचेल.
३. गाडी संख्या ०७५०३ नांदेड ते पंढरपूर विशेष गाडी : हि गाडी दिनांक १८ नोव्हेंबर रोजी गुरुवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री १८. २० वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, परळी, घटनांदूर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बारशी, कुर्डुवाडी मार्गे पंढरपूर येथे दिनांक १९ नोव्हेंबर ला सकाळी ०८.०० वाजता पोहोचेल.
४. गाडी संख्या ०७५०४ पंढरपूर ते नांदेड विशेष गाडी : हि गाडी दिनांक १९ नोव्हेंबर रोजी (शुक्रवारी) पंढपूर रेल्वे स्थानकावरून रात्री २०.०० वाजता सुटेल आणि लातूर, परळी, परभणी, नांदेड, किनवट मार्गे आदिलाबाद येथे दिनांक २० नोव्हेंबर रोजी दुपारी १३. १५ वाजता पोहोचेल.
या गाड्यांना २० डब्बे असतील, ज्यात द्वितीय शय्या, वातानुकूलित तसेच जनरल डब्बे असतील .
गाड्यांचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.
बी) काचीगुडा-रोटेगाव-काचीगुडा एक्स्प्रेस डेमू गाडी दिनांक १५ नोव्हेंबर 2021 पासून सुरु होणार - या गाडीचा जुना नंबर ५७५६१ /५७५६२ काचीगुडा-रोटेगाव-काचीगुडा सवारी गाडी असा होता. हि गाडी यापुढे पुढील आदेश प्राप्त होई पर्यंत डेमू अनारक्षित एक्स्प्रेस बनून धावेल.
१. गाडी संख्या ०७५७१ काचीगुडा ते रोटेगाव डेमू एक्स्प्रेस विशेष गाडी : हि गाडी दिनांक १५ नोव्हेंबर पासून काचीगुडा ते रोटेगाव दरम्यान पुढील आदेश प्राप्त होई पर्यंत नियमित धावणार आहे. हि गाडी काचीगुडा रेल्वे स्थानकांवरून सकाळी ०४.५० वाजता सुटेल आणि मेदचल, निझामाबाद, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद मार्गे रोटेगाव येथे रात्री २०. ३० वाजता पोहोचेल.
२. गाडी संख्या ०७५७२ रोटेगाव ते काचीगुडा डेमू एक्स्प्रेस विशेष गाडी : हि गाडी दिनांक १५ नोव्हेंबर पासून रोटेगाव ते काचीगुडा रेल्वे स्थानकांदरम्यान पुढील आदेश प्राप्त होई पर्यंत नियमित धावणार आहे. हि गाडी रोटेगाव रेल्वे स्थानकावरून रोज सकाळी ०५.४० वाजता सुटेल आणि औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, निझामाबाद मार्गे काचीगुडा रेल्वे स्थानकावर रात्री २२.४५ वाजता पोहोचेल.
No comments:
Post a Comment