मांडवी येथे शनिवारी शासकिय सेवा व योजनांचा महा मेळावा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 10 November 2021

मांडवी येथे शनिवारी शासकिय सेवा व योजनांचा महा मेळावा

किनवट ,दि.१० :जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मांडवी (ता. किनवट) येथे शनिवारी(ता.१३) सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत "शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा",आयोजित करण्यात आला आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचावी व त्यांचा लाभ त्यांना मिळावा, त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, दिवाणी न्यायाधीश एस.बी.अंभोरे व सहदिवाणी न्यायाधीश व्ही.जी.परवरे यांनी दिली.

  या महामेळाव्यास उपस्थित राहून सर्व योजनांच्या माहीतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.अरविंद चव्हाण, सचिव ॲड.पंकज गावंडे, किनवट तालुका ग्राहक पंचायत या स्वंयसेवी ग्राहक संस्थेचे अध्यक्ष ॲड.मिलिंद सर्पे व सचिव प्रा.विशाल गिमेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages