आयुष ढवळे चे ‘नीट’ परीक्षेत यश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 10 November 2021

आयुष ढवळे चे ‘नीट’ परीक्षेत यश

किनवट, दि.10 : गोकुंदा येथील आयुष नामदेवराव ढवळे या विद्यार्थ्याने ‘नॅशनल एन्ट्रन्स एलिजिलबिलिटी टेस्ट’(एनइइटी)‘नीट’ या वैद्यक शाखा प्रवेश  परीक्षेमध्ये भरघोस यश मिळविले आहे. या परिक्षेत त्याने 720 पैकी 628 गुण संपादन केले असून, त्याची टक्केवारी 87.22 इतकी आहे.


  या नीट परीक्षेमध्ये त्याचा ‘ओबीसी’ मधून 3,200 वा तर देशातून  8,757 वा रँक आलेला आहे. जीवशास्त्र (बायोलॉजी) या विषयात 360 पैकी 360 मिळवून एक प्रकारे विक्रमच केला आहे. बारावी परीक्षेत त्याला 90 टक्के गुण मिळाले होते. आपल्या यशाविषयी बोलतांना आयुष म्हणाला की, मला नीट परीक्षेत यश मिळाल्याचा खूप आनंद झाला असून, यासाठी मी विशेष परिश्रम घेतले होते. रोज न चुकता सहा तास तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन व सहा तास अभ्यास केला होता. तसेच मागील 10-12 वर्षातील पेपर ही सोडविले होते. आयुषच्या या यशाबद्दल तालुक्यातील आप्त,स्वकीय, मित्रमंडळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, कौतुक केले जात आहे. एलआयसी डेव्हलपमेंट अधिकारी संजय मरडे यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Pages