अॅड.श्रीकृष्णा राठोड यांची विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 26 November 2021

अॅड.श्रीकृष्णा राठोड यांची विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड

किनवट ,दि.२६ : दिवाणी व फौजदारी न्यायालयातील जेष्ठ अभिवक्ता अॅड.श्रीकृष्णा राठोड  यांची मुलाखतीतून सहाय्यक सरकारी अभिवक्तापदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

   अॅड.श्रीकृष्णा मोहनराव राठोड हे मागील अनेक वर्षांपासून किनवट न्यायालयात वकिली करीत आहेत.एक यशस्वी वकिल म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.अभिवक्ता संघाचे सचिव म्हणूनही त्यांनी कांही वर्षे काम केले आहे.

 फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २५(३) नुसार विशेष सहाय्यक सरकारी पदासाठी ता.२४नोव्हेंबर रोजी नांदेड येथे घेतलेल्या मुलाखती मधून १९ उमेदवारांची निवड मुलाखत समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सदस्य चंद्रसेन देशमुख व आर.एस.चरके यांच्या समितीने केली आहे.

  निवड झाल्याबद्दल श्री. राठोड यांचे अभिनंदन किनवट अभिवक्ता संघाचे अध्यक्ष एड.अरविंद चव्हाण, उपाध्यक्ष एड.तौफिक कुरेशी,सचिव एड.पंकज गावंडे,सहसचिव एड.बिपीन पवार,कोषाध्यक्ष एड.सुनिल येरेकार व ईतर अभिवक्त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages